IMPIMP

Sandeep Deshpande | ‘असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही बघितले…’; मनसेच्या नेत्याचं थेट गृहमंत्र्यांना आव्हान

by nagesh
Dilip Walse Patil About Loudspeaker On Mosque | dilip walse patil there is no question of removing that horn home minister spoke clearly on raj thackerays ultimatum

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sandeep Deshpande | मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यावेळी भाषणात पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. मशिदीवरील भोंगे (Loudspeaker) खाली उतरवा नाहीतर आम्ही मशिदीसमोर स्पीकर लावून मोठ्या आवाात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावू, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले होते. यावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करू असं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil)यांना आव्हान दिलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गृहमंत्र्यांनी कायदा कसा राबावायचा हे शिकलं पाहिजे. माझी दिलीप वळसे-पाटील यांना विनंती आहे की जे उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) आदेश आहेत. त्या आदेशाचं पाहिलं पालन करा, न्यायालयाने भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिलेत त्याचं पालन करा मग आम्हाला धमक्या द्या, असं संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी म्हटलं आहे.

 

 

असे धमकी देणारे खूप गृहमंत्री (Home Minister Maharashtra) आम्ही बघितले आहेत. आम्हाला त्यांचा फरक पडत नाही.
आमची जी मागणी आहे ती कायद्याचं राज्य यावं, कायद्याचं पालन व्हावं ही आहे याचा त्यांनी विचार करायला पाहिजे, असं देशपांडे यांनी म्हटल आहे.

 

 

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या आव्हानानंतर दिलीप वळसे-पाटील काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणारं आहे.

 

 

Web Title : Sandeep Deshpande | mns sandeep leader deshpande slams maha home minister dilip walse patil over mosque loudspeaker issue

 

हे देखील वाचा :

Girish Bapat On Pune Metro | पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा युद्धपातळीवर (Fast Track) सुरू करा – खासदार गिरीश बापट

Alzheimer’s Bone Disease And Cancer | ‘या’ आजारांच्या रुग्णाला अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न ठेवण्याची सवय ठरेल घातक

Sanjay Raut | ‘कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले तरी…’; ठाकरे-गडकरी भेटीनंतर राऊतांची प्रतिक्रिया !

 

Related Posts