IMPIMP

Sanjay Raut | ‘कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले तरी…’; ठाकरे-गडकरी भेटीनंतर राऊतांची प्रतिक्रिया !

by nagesh
Sanjay Raut | shivsena sanjay raut on mns raj thackeray bjp nitin gadkari meeting

नवी दिल्ली : वृत्त संस्था Sanjay Raut | राज्याच्या राजकारणातील गणित बदलण्याची चिन्ह दिसत आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडव्या दिवशी केलेल्या भाषणामध्ये महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) आणि राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष्य केलं होतं मात्र भाजपबाबत (BJP) त्यांनी एक चकोरही शब्द काढला नाही. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी त्यांची भेट घेतल्याने राज्यात अनेक मनसे-भाजप युतीच्या चर्चांणा उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कितीही असंतुष्ट आत्मे एकत्रं आले, महाराष्ट्राविरुद्ध, मराठी माणसांविरुद्ध कितीही कट कारस्थान केली, मुंबईविरुद्ध कट कारस्थानं केली तरी त्यांच्या छाताडावर पाय देऊन मुंबई पालिका आम्ही जिंकू ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. दिल्लीमध्ये राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

 

राज्याचं नेतृत्व शिवसेना (Shivsena) करते याचा अर्थ शिवसेनेला राजकारण उत्तम कळतं, शिवसेनेत निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि शिवसेनेला राज्यातील जनतेचा पाठिंबा आहे. महाराष्ट्रात, देशाच्या राजकारणात रात गई, बात गई, असं म्हणत राऊतांनी मनसेला टोला लगावला.

 

 

दरम्यान, आम्हीही अनेकांना भेटतो, आमच्याकडे अनेकजण येतात. प्रत्येक भेटीमागे राजकारण असतं असं नाही.
त्यावर आम्ही बोलावं असं काही नाही, असं संजय राऊत गडकरी आणि ठाकरेंच्या भेटीबाबत बोलले.

 

 

Web Title : Sanjay Raut | shivsena sanjay raut on mns raj thackeray bjp nitin gadkari meeting

 

हे देखील वाचा :

Pune Revenue Department | महसूल वसुलीत पुणे अव्वलस्थानी; तब्बल 750 कोटींचा महसूल जमा

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! एमईएस इलेव्हन, गेम चेंजर्स इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 63 जणांवर कारवाई

 

Related Posts