IMPIMP

Sangli News | एकरकमी FRP चे आंदोलन सांगली जिल्ह्यात हिसंक वळणावर; राजारामबापू, क्रांती साखर कारखान्यांचे ट्रॅक्टर पेटविले

by nagesh
Sangli News | FRP agitation on a violent turn in Sangli district; Rajarambapu sahakari sakhar karkhana, Kranti set fire to the tractors of sugar factories

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन  Sangli News | एकरकमी एफआरपीचे (FRP) आंदोलन सुरु असून त्याला जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा हिंसक वळण लागले. ऊस वाहतूक करणारे राजारामबापू (Rajarambapu Sahakari Sakhar Karkhana), क्रांती (Kranti) या साखर कारखान्यांचे ट्रॅक्टर पेटविण्यात आले. विश्वास कारखान्याच्या ट्रॅक्टर पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghatana) कार्यकर्त्यांकडून हे ट्रॅक्टर पेटवून देण्यात आले (Sangli News) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

राजारामबापू कारखान्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आहेत.
तर, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुण लाड (Arun Lad) तर विश्वास कारखान्याचे अध्यक्ष
आमदार मानसिंगराव नाईक (MLA Mansingrao Naik) हे आहेत.

राजारामबापू कारखान्याचा ट्रॅक्टर वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे पेटविण्यात आला. ट्रॅक्टर ऊस घेऊन जात असताना अचानक काही कार्यकर्ते समोर आले. त्यांनी ट्रॅक्टरवरील चालकासह इतरांना खाली उतरविले व टायरवर पेट्रोल टाकून तो पेटवून देण्यात आला व ते पळून गेले. क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर कडेगाव तालुक्यातील बळवडी फाटा  येथे पेटविण्यात आला.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी अशी मागणी केली आहे. या  मागणीला सोलापूर (Solapur), कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. सांगली जिल्ह्यात दत्त इंडिया व दालमिया दोन कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. मात्र, राजारामबापू, क्रांती आणि विश्वास कारखान्यांनी मात्र भूमिका जाहीर केली नाही़ तसेच कारखाने सुरु केले. त्यामुळे इतरांना परवडते तर या कारखान्यांनीही एकरकमी एफआरपी द्यावी, यासाठी आंदोलन सुरु (Sangli News) झाले आहे.

 

Web Title: Sangli News | FRP agitation on a violent turn in Sangli district; Rajarambapu sahakari sakhar karkhana, Kranti set fire to the tractors of sugar factories

 

हे देखील वाचा :

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,016 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Maharashtra Rains | राज्यात पुन्हा पावसाचा इशारा ! कोकणसह दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता

Crime News | आमदाराच्या 16 वर्षाच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

Related Posts