IMPIMP

Sanjay Raut on President Rule | ‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर महाराष्ट्रासोबत उत्तर प्रदेशमध्येही लावा’ – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut | shivsena mp sanjay raut bail plea hearing before pmla court adjourned till 10 october in patra chawl scam case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut on President Rule | अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी ‘हनुमान चालिसा’ (Hanuman Chalisa) पठणावरून केलेलं आंदोलन, त्यानंतर त्यांना झालेली अटक, त्यासोबतच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) त्यांना पोलीस ठाण्यामध्ये भेटायला गेल्यावर त्यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा सर्व घटनाक्रम पाहता राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील (BJP) नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut on President Rule) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना (CM), गृहमंत्र्यांना भेटायला हवं. जर राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लावायचीच असेल तर उत्तर प्रदेशमध्येही (Uttar Pradesh) लावा ना. ढोंग चालली आहेत सगळी, दोन चार येतात दिल्लीत उतरतात, केंद्रीय गृहसचिवांना (Central Home Secretary) भेटतात हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. थोडस रक्त आलं तर चालले ‘राष्ट्रपती राजवट’ लावायला, असं संजय राऊत (Sanjay Raut on President Rule) म्हणाले.

 

महाराष्ट्राचं भाजप शिष्टमंडळ हे दिल्लीत (Dehli) दाखल झालं आहे. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी
दाद मागण्यासाठी शिष्टमंडळ दिल्लीमध्ये गेलं असून स्पेशल टीम (Special Team) पाठवून झालेल्ला हल्ल्याची चौकशी करावी
आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांच्या राजीनाम्याची मागणी सोमय्यांनी केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, भाजप नेते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असताना
ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या ट्विटची जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल, असं जिंतेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे आता पुढील घडामोडींकडे सर्व राज्याचं लक्ष लागलंं आहे.

 

Web Title :- Sanjay Raut on President Rule | Shivsena leader sanjay raut on somaiya if you want to impose presidential rule then bring it together in uttar pradesh and maharashtra why did raut say that

 

हे देखील वाचा :

Health Benefits Of Ghee | केसांसाठी तूप अतिशय उपयुक्त घटक; ‘हे’ आहेत त्याचे फायदे, जाणून घ्या

Dr. Madhav Godbole | निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे पुण्यात 85 व्या वर्षी निधन

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना पुन्हा लागणार लॉटरी, DA नंतर आता वाढतील ‘हे’ 4 भत्ते!

 

Related Posts