IMPIMP

Satej Patil | ‘माणसं खाणारा’ म्हणणार्‍या चंद्रकांत पाटलांना सतेज पाटलांचं उत्तर; म्हणाले…

by nagesh
Chandrakant Patil On Kolhapur North By Election | BJP leader chandrakant patil criticized on congress leader and maharashtra minister satej patil kolhapur by election final result

कोल्हापूर :  सरकारसत्ता ऑनलाइन Satej Patil | कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या राज्यात चर्चा आहे. या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी (BJP) आणि काँग्रेस (Congress) आमने-सामने आले आहेत. भाजपने सत्यजीत कदम (Satyajit Kadam) यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसकडून जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दरम्यान सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज भरण्याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडीमधील राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर निशाणा साधला. यानंतर सतेज पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”बंटी पाटील माणसं खाणारा माणूस आहे.” अशी खरमरीत टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. यानंतर आज काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्याआधी सतेज पाटील (Satej Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला. “कोल्हापुरात 2019 विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजप यांची युती होती. पण कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवार उभे करून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. पराभवाचे हे शल्य शिवसैनिक विसरणार नाहीत. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला माहित आहे”. असं सतेज पाटील म्हणाले.

 

पुढे बोलताना सतेज पाटील म्हणाले की, “भाजपाच्या पायाखालची वाळू घसरत चालली असल्याने ते खालच्या पातळीवरची टीका करत आहेत. निवडणूक का लढवली याची चूक त्यांना आता लक्षात येऊ लागली आहे. त्यातूनच वैयक्तिक टीकाटिपणी करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. तर “राज्यात शिवसेनेच्या सहकार्याने भाजपाचा विस्तार झाला. सत्ता आल्यावर भाजपाने शिवसेनेला वाईट वागणूक दिली. याचे साक्षीदार शिवसैनिक आहेत. ते भाजपाच्या खोट्या आरोपांना फसणार नाहीत.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

”पन्नास वर्षातील काँग्रेसचे कार्य आणि भाजपाचे 5 वर्षांचे कार्य याबाबत चंद्रकांत पाटील यांच्याशी कुठेही चर्चा करण्याची तयारी आहे.
कोल्हापूरची पोटनिवडणूक भाजपाने जयश्री जाधव यांना निवडून देऊन बिनविरोध करायला हवी होती.
यातून भाजपाच्या संस्कारी राजकारणाचे दर्शन घडले असते.
पण सूडबुद्धीचे राजकारण म्हणून पोटनिवडणूक लादली असली तरी जनता काँग्रेसच्या मागे असल्याचं सतेज पाटील म्हणाले.

 

दरम्यान, सतेज पाटील यांनी म्हटलं की, ”सार्वत्रिक निवडणूक असल्याप्रमाणे भाजपा शक्तीप्रदर्शन करत उत्साहाने उमेदवारी अर्ज भरत आहे.
आमदार चंद्रकांत जाधव यांचं अकाली निधन झालं असल्याचं भान त्यांनी पाळलेलं नाही.
भाजपाची उमेदवारी आयात असल्याने कोल्हापुरातील भाजपा, संघाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मान्य नाही.”

 

Web Title :- Satej Patil | congress leader satej patil on bjp chandrakant patil north kolhapur by election

 

हे देखील वाचा :

Pune Crime | संतापजनक ! पत्नीला अश्लील व्हिडीओ दाखवून केले अनैसर्गिक कृत्य

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात प्रेमसंबंधातून झालेल्या ‘त्या’ खून प्रकरणात प्रेयसीला अटक, मुलीनेच कट रचल्याचे तपासात आले समोर

Urfi Javed Bold Photo | उर्फी जावेदनं कॅमेरासमोर फ्रंन्ट ओपन ड्रेस घालून दिला सेक्सी लूक, लाल रंगाच्या हॉट ड्रेसनं सोशल मीडियाचा वाढवला पारा..

 

Related Posts