IMPIMP

Sharad Pawar | ‘शाई फेकणे चूक; पण चंद्रकांत पाटलांच्या विधानाकडे…’; काय म्हणाले शरद पवार

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar the type of backbiting is not right but sharad pawar told chandrakant patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान
केल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी (दि. 10) शाई फेकण्यात आली. त्यावरून भाजप आक्रमक झाला आहे, तर विरोधी
पक्षांनी त्यावर आपल्या भूमिका मांडल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. टीका करण्याचा
सर्वांना अधिकार आहे; पण टीका करताना शाई फेकणे योग्य नाही. आम्ही त्याचे समर्थन करणार नाही, पण चंद्रकांत पाटील यांच्या विधानाकडे दुर्लक्ष
करूनही चालणार नाही. त्यांनी ते विधान केले नसते, तर हा प्रकार घडला नसता, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शरद पवार वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, शिक्षण मंत्र्यांवर शाईफेकीचा प्रकार झाला. मी त्याचे समर्थन करणार नाही. विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार जसा त्यांचा आहे, तसाच सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार आपल्याला आहे. मात्र, टीका करणे याचा अर्थ कुणाच्या अंगावर शाई फेकणे असा होत नाही. चंद्रकांत पाटील यांनीच या वादाला तोंड फोडले. शिक्षण मंत्र्यांनी जे विधान पैठणमध्ये केले, त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यांनी ते विधान केले नसते, तर शाईफेकीचा प्रकार घडला नसता. त्यांनी वापरलेला शब्द ‘भीक’ कुणालाही आवडला नाही, आवडणार नाही. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर साहेब आणि भाऊराव पाटलांचे संपूर्ण जीवन साऱ्या देशाला माहीत नाही. पैसे नसताना भाऊराव पाटलांनी आपल्या पत्नीचे दागिने विकून शाळा चालवली होती. कर्मवीरांच्या संस्थेचे ब्रीद आहे, ‘कमवा आणि शिका’ भीक मागा असे नाही. त्यामुळे पाटलांनी आपले शब्द मागे घेतले पाहिजेत.

 

मी महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या सर्वपक्षीय मित्रांना आवाहन करतो की, शाई टाकणे,
तत्सम कृत्य करणे, असले प्रकार आपण करणार नाही, अशी भूमिका आपण घेऊया.
तसेच सुसंस्कृत महाराष्ट्राचा लौकिक टिकवण्याची खबरदारीही आपण सर्वांनी घेऊया,
असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title :- Sharad Pawar | sharad pawar the type of backbiting is not right but sharad pawar told chandrakant patil

 

हे देखील वाचा :

Shah Rukh Khan | शाहरुख खानने मुलाखतीदरम्यान त्याच्या ‘या’ वाईट सवयीबद्दल केला खुलासा

Pune Crime | सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ व्यावसायिकाला घातला 11 लाखांचा गंडा

Indian Navy | भारतीय नौदलात आता महिलाही होऊ शकतात मार्कोस कमांडो

 

Related Posts