IMPIMP

Indian Navy | भारतीय नौदलात आता महिलाही होऊ शकतात मार्कोस कमांडो

by nagesh
Indian Navy | indian navy opens- up special forces marcos for women in historic move

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – भारतीय नौदलाने महिला अधिकाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय नौदलाच्या (Indian Navy)
स्पेशल फॉर्सेसमध्ये महिलांना कमांडो म्हणून सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असे
नौदलाने स्पष्ट केले आहे. भूदल, नौदल आणि हवाईदल या तीनही दलांत काही सैनिकांना विशिष्ट प्रशिक्षण दिले जाते. त्याला स्पेशल फोर्स असे म्हणतात.
यातील जवान स्पेशल मिशनवर जाण्यासाठी निवडले जातात. या मिशनसाठी तयार करण्यात येणाऱ्या सैनिकांना (Indian Navy) खडतर प्रशिक्षण दिले
जाते. या प्रशिक्षणानंतर जर महिला अधिकारी नौदलाच्या परीक्षेत खऱ्या उतरल्या, तर नौदलात त्यांची मार्कोस म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. त्यामुळे
भारतीय लष्कराची ही ऐतिहासिक घोषणा आहे.

 

यापुढे नौदलातील महिला मरीन कमांडो म्हणजे मार्कोस बनू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना विशेष आणि खडतर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागणार आहे. पुढील वर्षीच्या अग्निवीर भरतीमध्ये भारतीय नौदलात सामील होणाऱ्या महिला अधिकारी आणि नाविक यांना मार्कोसच्या प्रशिक्षणाची परवानगी देण्यात येईल, अशी माहिती नौदलाने दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नौदलातील मार्कोसना अनेक मोहिमांसाठी प्रशिक्षण देण्यात येते.
ते समुद्रात, हवाईदलात आणि जमिनीवरही (आर्मी) मोहीम राबवू शकतात.
हे कमांडो शत्रूच्या युद्धनौका, लष्करी तळ, विशेष ड्रायव्हिंग ऑपरेशन्स आणि टोही मोहिमांवर गुप्त हल्ले करू शकतात. मार्कोस हे सागरी क्षेत्रात दहशतवाद्यांशी लढू शकतात.
मार्कोसना दहशतवादविरोधी भूमिकेत काश्मीरमधील वुलर लेक परिसरात तैनात करण्यात येते.
त्यामुळे आगामी काळात ही महत्त्वपूर्ण जबाबदारी महिलांनादेखील देण्यात येणार आहे.

 

Web Title :- Indian Navy | indian navy opens- up special forces marcos for women in historic move

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर रात्री व्हिडिओ काढणाऱ्या ‘या’ पक्षाच्या कार्यकर्त्याला अटक

Nitesh Rane | ‘जो गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल, त्या …;’ नीतेश राणेंनी दिली धमकी

INDW vs AUSW 2nd T20 | स्मृती मंधानाने रचला इतिहास; ही कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय खेळाडू

Shivsena | शिवसेनेच्या मूळ नावावर आणि पक्ष चिन्हावरील दाव्यासाठी निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय

 

Related Posts