IMPIMP

Shruti Haasan | श्रुती हासनने सिनेसृष्टी बद्दल केले ‘हे’ मोठे वक्तव्य; म्हणाली “मी कधीही दिखावा केला नाही…”

by nagesh
Shruti Haasan | shruti hasaan opens up about her struggle in bollywood

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : अभिनेत्री श्रुति हासन (Shruti Haasan) तिच्या अभिनयापेक्षा तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि ती स्टारकिड असल्यामुळे चर्चेत असते. सिनेसृष्टीत तिने पदार्पण करताचा अनेकांनी तिला खूप ऐकवले होते. स्टारकिड असल्यामुळे तिला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही असे देखील बोलले गेले. मात्र श्रुतीने (Shruti Haasan) या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत स्वतःची अशी एक वेगळी जागा चाहत्यांच्या मनात निर्माण केली आहे. तर आता पहिल्यांदाच श्रुतीने या सगळ्यावर भाष्य केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एका मुलाखतीत श्रुती म्हणाली की, “माझ्या करिअरच्या सुरुवातीला अनेकांनी मला खूप सुनावले. तुझे बोलणे लोकांना कळणार नाही असेही सांगितले. लोक माझ्याबद्दल खूप काही वाईट बोलायचे. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करत मी जशी आहे तशी प्रेक्षकांसमोर उभी राहिले आणि प्रेक्षकांनी मला स्वीकारलं. मी आजवर कधीच दिखावा केला नाही किंवा कोणाची मन दुखावली नाही एवढेच नाही तर मी कधीच कोणाचे कामही हिसकावून घेतले नाही. पण तरीही लोक माझ्यावर नेहमीच टीका करतात”.

 

 

श्रुती (Shruti Haasan) नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते.
श्रुतीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती सध्या ‘द आय’ या हॉलीवुड चित्रपटाच्या चित्रीकरणांमध्ये व्यस्त आहे.
तर पुढच्या वर्षी ती प्रभास बरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shruti Haasan | shruti hasaan opens up about her struggle in bollywood

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | त्यांची नजर वाईट आहे, त्यामुळे आरएसएसने काळजी घेण्याची गरज; मुख्यमंत्र्यांच्या आरएसएस कार्यालय भेटीवर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य…

Pathaan | पठाण चित्रपटासाठी पुन्हा एकदा धक्का; सेन्सॉर बोर्डाने सुचवले ‘हे’ बदल

MLA Siddharth Shirole | खडकीसह सहा कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या विकासासाठी दरवर्षी निधी द्यावा; आमदार शिरोळे यांची मागणी

 

Related Posts