IMPIMP

Sidharth-Kiara Wedding | सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच लग्नबंधनात अडकणार; शाही महालात पार पडणार लग्न

by nagesh
Sidharth-Kiara Wedding | sidharth kiara wedding update suryagarh palace inside photos viral

सरकारसत्ता ऑनलाईन  – Sidharth-Kiara Wedding | सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती म्हणजे बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाविषयी. अखेर हे दोघे आता लवकरच लग्न बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनेक दिवसांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता हे दोघे आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या आठवड्यात हे दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत. (Sidharth-Kiara Wedding)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार हे जोडपे राजस्थानमधील जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही थाटात लग्न करणार आहे. यासाठी पूर्वतयारी झाली असून या पॅलेसचे काही फोटोज सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. या शाही पॅलेस मधील इन साईट फोटो आता समोर आले आहेत. याचा थाट पाहून सर्वच थक्क झाले आहेत. कियारा आणि सिद्धार्थने लग्नात येणाऱ्या पाहुण्यासाठी या रॉयल पॅलेस मध्ये 84 खोल्या बुक करून ठेवल्या आहेत. या पॅलेस मधील रात्रीचा नजारा फार सुंदर असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी लोकगीत, लोकनृत्य आणि विविध कार्यक्रम देखील होत असतात. सिद्धार्थ आणि कियारा यांचे लग्न काही खास सेलिब्रिटी आणि फ्रेंडच्या उपस्थितीतच पार पडणार आहे. तर त्यांच्या या वेडिंग डेस्टिनेशनने सोशल मीडियावर आता धुमाकूळ घातला आहे. (Sidharth-Kiara Wedding)

 

 

कियाराच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास तीने ‘कबीर सिंग’, ‘शेरशा’, ‘भूल भुलैया 2’ या अशा अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले होते. तर आता कियारा लवकरच ‘सत्य प्रेम की कथा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या कियाराच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सिद्धार्थ मल्होत्राच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच ‘योद्धा’ या चित्रपटात झळकणार आहे. सिद्धार्थने ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Sidharth-Kiara Wedding | sidharth kiara wedding update suryagarh palace inside photos viral

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘…आणि तिथेच खरी गफलत झाली’, शिवसेनेतील बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Womens IPL | बीसीसीआयचे अखेर ठरलं ! ‘या’ दिवशी पार पडणार महिलांच्या आयपीएलचा लिलाव; जाणून घ्या

Ravikant Shukla | भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूला जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमके प्रकरण

 

Related Posts