IMPIMP

Smriti Mandhana | स्मृती मंधानाने रचला इतिहास ! BBL मध्ये शतक करणारी ठरली पहिली भारतीय, 64 बॉलमध्ये नाबाद 114 रन

by nagesh
Smriti Mandhana | sangli's smriti mandhana first indian to score century in women big bash league

मेलबर्न : सरकारसत्ता ऑनलाइन Smriti Mandhana | सांगलीच्या (Sangli) स्मृती मंधानाने ( Smriti Mandhana) ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) इतिहास रचला आहे. या स्पर्धेत शतक करणारी स्मृती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. सिडनी थंडरकडून (Sydney Thunder) खेळताना स्मृतीने 64 बॉलमध्ये नाबाद 114 रन केले. तिने आपल्या खेळीत 14 फोर आणि 3 सिक्स लगावले. म्हणजेच तिने अवघ्या 17 बॉलमध्ये 74 रन केले आहेत. स्मृतीच्या ( Smriti Mandhana) या खेळीनंतरही सिडनीच्या टीमने हा सामना 4 रनने गमावला. मेलबर्नने पहिले बॅटिंग करत 4 विकेट गमावून 175 रन केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सिडनीने 2 विकेट गमावून 171 रन केले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सिडनी थंडरला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 13 रनची गरज होती पण भारतीय टी-20 टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरने
या ओव्हरमध्ये फक्त 8 रन देऊन आपल्या टीमला रोमांचक विजय मिळवून दिला.
मंधानाने (Smriti Mandhana) या ओव्हरमध्ये 4 बॉलचा सामना केला, पण तिला फक्त 6 रन करता आले.
हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) या सामन्यात शानदार बॉलींग करत 4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन एक विकेट मिळवली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

याआधी मेलबर्नकडून खेळणाऱ्या हरमनप्रीतने बॅटिंग करत 55 बॉलमध्ये नाबाद 81 रन केले, यामध्ये 11 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता.
स्मृती मंधानाने या शतकासह बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक वैयत्तिक स्कोअर करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
याआधी 2017 साली एश्ले गार्डनरने (Ashleigh Gardner) सिडनी सिक्सर्सकडून (Sydney Sixers) खेळताना 114 रन केले होते.

 

Web Title : Smriti Mandhana | sangli’s smriti mandhana first indian to score century in women big bash league

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau Pune | 10 हजारांची लाच घेताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; बारामती तालुक्यातील घटना

Urmila Arjunwadkar | अभिमानास्पद ! जयसिंगपूरची कन्या झाली अमेरिकेत नगरसेविका

Parambir Singh | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग 30 दिवसांत हजर न झाल्यास संपत्ती जप्त?

 

Related Posts