IMPIMP

Anti Corruption Bureau Pune | 10 हजारांची लाच घेताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; बारामती तालुक्यातील घटना

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau Pune | जमिनीचे क्षेत्र दुरुस्तीची नोंद करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) सापळा रचून बारामती तालुक्यातील सजा निंबुतच्या मधुकर मारुती खोमणे (Madhukar Maruti Khomane) या तलाठ्याला रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीचे क्षेत्र दुरुस्तीची नोंद करण्यासाठी तक्रारदारांनी अर्ज केला होता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

ही नोंद करण्यासाठी तलाठी मधुकर खोमणे याने त्यांच्याकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Anti Corruption) त्याची पडताळणी करण्यात आली. यामध्ये तलाठी मधुकर खोमणे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode) यांच्या मार्गदर्शनाखाली सजा निंबुत येथील तलाठी कार्यालयात सापळा रचून तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच घेताना खोमणे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
यानंतर तलाठी मधुकर खोमणे यांच्याविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात (Wadgaon Nimbalkar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक संदीप वर्हाडे (Police Inspector Sandeep Varhade) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Pune | talathi caught acb bribe 10 thousand registration baramati taluka incident

 

हे देखील वाचा :

Urmila Arjunwadkar | अभिमानास्पद ! जयसिंगपूरची कन्या झाली अमेरिकेत नगरसेविका

Parambir Singh | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग 30 दिवसांत हजर न झाल्यास संपत्ती जप्त?

Pune Corporation | पुणे मनपा निवडणूक ! प्रभाग रचनेसाठी ‘वेटींग’ करणार्‍या काही नगरसेवकांनी ‘विकास कामांच्या’ वर्क ऑर्डर ठेवल्या ‘होल्ड’वर

 

Related Posts