IMPIMP

Solapur Lok Sabha | धक्कादायक! सोलापुरात मतदाराने पेट्रोल टाकून जाळली EVM मशीन, घटनेनंतर बंदोबस्त वाढवला (Video)

by sachinsitapure

सांगोला (Sangola) तालुक्यातील बागलवाडी येथे शांतपणे मतदान प्रक्रिया सुरू होती. यावेळी एका मतदाराने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. ही आग ताबडतोब विझवण्यात आली. यामध्ये ईव्हीएम मशीनचे थोडे नुकसान झाले. यानंतर काही काळ मतदान प्रक्रिया बंद पडली होती.

दरम्यान, सांगोला येथील सहायक्क निवडणूक निर्णय अधिकारी यांना घटनेबाबत अधिक माहितीसाठी विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. नवीन ईव्हीएम मशीन आणून मतदानाला पुन्हा सुरुवात झाली. घटनेनंतर बागलवाडी मतदान केंद्रावरील बंदोबस्त वाढवण्यात आला.

सोलापूर व माढा लोकसभेसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. सकाळी ८ वाजेपर्यंत सोलापूर लोकसभेसाठी बारा टक्के तर माढा लोकसभेसाठी दहा टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) उमेदवार आहेत. तर माढा मतदारसंघात (Madha Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) आहेत.

Related Posts