IMPIMP

Sukanya Samriddhi Yojana | तुमच्या मुलीला कधीही भासणार नाही पैशांची कमतरता ! केवळ 416 रुपये गुंतवून मिळवा 65 लाख, जाणून घ्या

by nagesh
SSY | sukanya samriddhi yojana save 1 rupee daily and earn 15 lakh at maturity check details know how SSY

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Sukanya Samriddhi Yojana | तुम्ही सुद्धा मुलीचे वडील असाल तर या दिवाळीला आपल्या मुलीसाठी काहीतरी विशेष करा. या दिवाळीला घरच्या लक्ष्मीसाठी (Diwali 2021) अशी योजना बनवा की तुमच्या लाडकीला कधीही पैशांची अडचण येणार नाही. तुम्ही तुमच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samriddhi Yojana) रोज केवळ 416 रुपये वाचवून मोठा फंड बनवू शकता. ही 416 रुपयांची रोजची बचत पुढे जाऊन मुलीसाठी 65 लाख रुपयांची मोठी रक्कम बनवू शकता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

काय आहे सुकन्या समृद्धी योजना?
Sukanya Samriddhi Yojana एक अशी दिर्घ कालावधीची योजना आहे, जिच्यात गुंतवणूक करून तुम्ही मुलीचे शिक्षण आणि भविष्याबाबत निश्चिंत होऊ शकता. यासाठी खुप जास्त रक्कम सुद्धा गुंतवण्याची गरज नाही. अगोदर हे ठरवा की मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर तिला किती रक्कम हवी. याबाबत पूर्ण कॅलक्युलेशन जाणून घेवूयात…

 

मुलींसाठी सरकारची शानदार योजना
10 वर्ष वयापर्यंत मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samriddhi Yojana) खाते उघडता येते. किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये वार्षिक जमा करू शकता. मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर स्कीम मॅच्युअर होईल. या योजनेत तुमची गुंतवणूक किमान तोपर्यंत लॉक होईल जोपर्यंत मुलगी 18 वर्षाची होत नाही. 18 वर्षानंतर सुद्धा ती या योजनेतून एकुण रक्कमेच्या 50 टक्के रक्कम काढू शकते. ज्याचा वापर ती ग्रॅज्युएशन किंवा पुढील शिक्षणासाठी करू शकते. यानंतर सर्व पैसे तेव्हा काढू शकते जेव्हा ती 21 वर्षाची होईल.

 

15 वर्षापर्यंतच पैसे जमा होतात
या योजनेत खाते उघडल्यापासून 15 वर्षापर्यंत पैसे जमा केले जाऊ शकतात. मुलीच्या वयाच्या 21 वर्षापर्यंत पैशांवर व्याज मिळत राहील. यावर वार्षिक व्याज 7.6 टक्के आहे. घरातील दोन मुलींसाठी हे खाते उघडता येते. जर जुळ्या असतील तर तिसर्‍या मुलीसाठी सुद्धा योजनेचा लाभ घेता येईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

कशी करावी गुंतवणुकीची तयारी
मुलगी 21 वर्षाची होईल तेव्हा तिला किती रक्कमेची आवश्यकता असेल हे प्रथम ठरवा. सुरूवात जेवढी लवकर कराल रक्कम तेवढ्या लवकर मॅच्युअर होईल.

 

कधी सुरू करावी गुंतवणुक
मुलगी आज 10 वर्षाची असेल आणि गुंतवणुक आजपासून सुरू केली तर केवळ 11 वर्षापर्यंत गुंतवणुक करू शकता, असेच जर मुलगी 5 वर्षाची असेल आणि आजपासून गुंतवणुक सुरू केली तर 16 वर्षापर्यंत गुंतवणुक करू शकता. ज्यामध्ये मॅच्युरिटी अमाऊंट वाढेल.

 

416 रुपयांनी असे बनवा 65 लाख रुपये
1. येथे आपण समजू की 2021 मध्ये गुंतवणुक सुरू केली तर मुलीचे वय आहे 1 वर्ष

2. आता 416 रुपयांची रोज बचत केली तर महिन्याचे होतात 12,500 रुपये

3. 12,500 रुपये दरमहिना जमा केले तर वर्षाचे झाले 15,00,00 रुपये

4. ही गुंतवणुक केवळ 15 वर्ष केली तर एकुण गुंतवणुक झाली 2,250,000 रुपये

5. 7.6 टक्के वार्षिक व्याजाच्या हिशेबाने एकुण व्याज मिळेल 4,250,000 रुपये

6. 2042 मध्ये जेव्हा मुलगी 21 वर्षाची होईल तर स्कीम मॅच्युअर होईल, त्यावेही एकुण मॅच्युरिटी अमाऊंट होईल 6,500,000 रुपये

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Sukanya Samriddhi Yojana | sukanya samriddhi yojana save rs 416 daily in sukanya samriddhi scheme it will become 65 lakh see calculation

 

हे देखील वाचा :

T20 World Cup | अजूनही टॉप 2 मध्ये राहू शकतो भारत, नॉकआऊटसाठी करू शकतो ‘क्वालिफाय’

EPFO | जर अजूनही आले नसतील तुमच्या अकाऊंटमध्ये PF च्या व्याजाचे पैसे तर असे तपासू शकता; जाणून घ्या पद्धत

Pune Crime | रिक्षा चालकांनो सावधान ! रिक्षात विसरलेल्या सामानाच्या बदल्यात पैसे मागाल तर जेलमध्ये जावं लागेल; मुंढवा पोलिसांकडून ‘खंडणी’ प्रकरणी एकाला अटक

 

Related Posts