IMPIMP

EPFO | जर अजूनही आले नसतील तुमच्या अकाऊंटमध्ये PF च्या व्याजाचे पैसे तर असे तपासू शकता; जाणून घ्या पद्धत

by nagesh
EPFO Pension Rule | pension rule big change now you will get pension on this date check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  EPFO | मोदी सरकारने (Modi Government) आर्थिक वर्ष 2020-21 साठी प्रॉव्हिडंट फंडावर मिळणार्‍या व्याजाचा दर 8.5 टक्केच कायम ठेवला आहे. 5 कोटीपेक्षा सुद्धा जास्त ईपीएफओ (EPFO) खातेधारकांच्या खात्यात व्याजाचे पैसे पाठवत आहे. जर तुमच्या खात्यात हे पैसे आले नसतील तर चिंता करू नका. पीएफ व्याज आले किंवा नाही हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता. याची पद्धत जाणून घेवूयात…

 

1. उमंग अ‍ॅपद्वारे ईपीएफ बॅलन्स चेक करा

 

प्ले स्टोरवरून उमंग अ‍ॅप डाऊनलोड करा. या अ‍ॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत.
यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हीस निवडा.
आता युएएन नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल.
तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

2. ईपीएफओ (EPFO) पोर्टलच्या माध्यमातून चेक करा पीएफ बॅलन्स

 

यासाठी https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर लॉग-इन करा. आता युएएन आणि पासवर्ड द्वारे लॉग-इन करा.
यानंतर डाऊनलोड व्ह्यू पासबुकच्या ऑपशनवर क्लिक करा.

 

3. SMS द्वारे

 

तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा.
सोबतच तो अ‍ॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल.
ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल. (EPFO)

 

Web Title : EPFO | if pf interest has not come in your account yet then you can check like this learn step by step method

 

हे देखील वाचा :

Pune Crime | रिक्षा चालकांनो सावधान ! रिक्षात विसरलेल्या सामानाच्या बदल्यात पैसे मागाल तर जेलमध्ये जावं लागेल; मुंढवा पोलिसांकडून ‘खंडणी’ प्रकरणी एकाला अटक

Anil Deshmukh | अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ED च्या कार्यालयात ‘हजर’

Suicide Case | महिला बँक मॅनेजर आत्महत्या प्रकरण ! IPS आशीष तिवारीसह 3 जणांवर FIR

 

Related Posts