IMPIMP

Pune Crime | रिक्षा चालकांनो सावधान ! रिक्षात विसरलेल्या सामानाच्या बदल्यात पैसे मागाल तर जेलमध्ये जावं लागेल; मुंढवा पोलिसांकडून ‘खंडणी’ प्रकरणी एकाला अटक

by nagesh
Pune Crime | Earlier a youth was stabbed and six others were remanded in police custody

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यात रिक्षाने प्रवास (rickshaw Travel) करत असताना अनेकवेळा प्रवाशांचे सामान रिक्षात विसरते. काही रिक्षा चालकांकडून प्रवाशांचे सामान पोलीस ठाण्यात (police station) जमा केले जाते. तर काही रिक्षा चालक सामान देण्याच्या बदल्या प्रवाशांकडे पैशांची मागणी करतात. अशाच एका ‘वाढीव’ रिक्षा चालकाला प्रवाशाला पैसे मागणे (Ransom) चांगलेच महागात (Pune Crime) पडले आहे. रिक्षात विसरलेल्या सामानाच्या बदल्यात पैशांची मागणी करणाऱ्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. तसेच अशा पद्धतीने प्रवाशांकडे पैशांची मागणी केली तर रिक्षा चालकांची गय केली जाणार नाही, असा इशारा मुंढवा पोलीस ठाण्याचे (Mundhwa Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी (Senior Police Inspector Brahmanand Naikwadi) यांनी दिला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी शेखर सिद्राम भंडारी Shekhar Sidram Bhandari (वय-31 रा. केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आरोपी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करुन आदर्श बाबासाहेब पालकर (वय-23 रा. लोणी काळभोर, पुणे) याला अटक केली आहे.
(Pune Crime) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल सिद्राम भंडारी हे 23 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास केशवनगर ते गाडीतळ रिक्षाने प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांचा मोबाईल रिक्षामध्ये विसरला.

 

मोबाईल रिक्षात विसरल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी वारंवार मोबाईलवर संपर्क साधला. परंतु आरोपीने त्यांचा मोबाईल परत देण्यास टाळाटाळ केली.
आरोपीने मोबाईल परत करण्यासाठी फिर्यादी यांच्याकडे 6 हजार रुपयांची खंडणी मागितली.
तसेच खंडणी दिली नाही तर मोबाईलमधील वैयक्तीक डाटा इतरांना शेअर करण्याची धमकी दिली.
फिर्यादी यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध तक्रार (Pune Crime) दाखल केली.

पोलिस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहाय्यक आयुक्त कल्याणराव विधाते (ACP Kalyanrao Vidhate), मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे (PSI Anil Binwade) यांनी आरोपीचा शोध सुरु केला.
अखेर आरोपीच्या मुसख्या आवळ्यात पोलिसांना यश आले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे (PSI Shivaji Kate) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Beware of rickshaw pullers! If you ask for money in exchange for forgotten luggage in a rickshaw, you will have to go to jail; Mundhwa police arrest one in ransom case

 

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ED च्या कार्यालयात ‘हजर’

Suicide Case | महिला बँक मॅनेजर आत्महत्या प्रकरण ! IPS आशीष तिवारीसह 3 जणांवर FIR

Mumbai Drugs Case | नवाब मालिकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘निशाणा’; अमृत फडणवीस यांचा फोटो शेअर करत केला ड्रग पेडलरसोबत ‘कनेक्शन’ असल्याचा आरोप

 

Related Posts