IMPIMP

Supriya Sule | ‘इंदापुरात मी पाटलांना घाबरतो’ राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंची टोलेबाजी, म्हणाल्या…

by nagesh
NCP MP Supriya Sule | 109 times raid on deshmukh family should make it to limca book of records said supriya sule

इंदापूर : सरकारसत्ता ऑनलाइन –  पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) उपस्थित होत्या. या कार्यक्रमात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Minister Dattatray Bharane) यांनी केलेल्या विधानानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जोरदार टोलेबाजी केली. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टोलेबाजीवर एकच हशा पिकला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पाटलांना मी इंदापुरात लई भीतो असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
दत्तात्रय भरणे यांनी हे वाक्य म्हणताच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्या वाक्याचा धागा पकडत म्हटले.
राज्यमंत्री भरणे कुठल्या पाटलांना घाबरतात मला कळलं नाही.
माझ्या दोन बहिणी देखील पाटलांच्या घरात दिल्या आहेत.
माझे कुठले मेव्हणे तुम्हाला त्रास देतात? त्यांनी असे म्हणताच भरणे म्हणाले, मी चेष्टेने म्हणालो.

यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्ही म्हणता इंदापुरातील पाटलांना तुम्ही घाबरता पण कुस्तीत तर पाटील यांना तुम्ही टेकवून ठेवलेत ना. आता काय राहिले तेव्हा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
इंदापूर विधानसभेत सलग दोन वेळा भाजपचे नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पराभूत केले याचा उल्लेख त्यांनी केला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुणे जिल्ह्यातील (Pune district) इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथील चिंकारा संरक्षण व जैवविविधता वन उद्यानामध्ये विकास कामांचे भूमिपूजन,
वनपर्यटनानंतर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधान केलं होतं.

 

Web Title : Supriya Sule | MoS dattatray bharane said i am scared because of indapur patil on this supriya sule replied said

 

हे देखील वाचा :

Earn Money | जर तुमचे सुद्धा असेल एखाद्या बँकेत अकाऊंट, तर मोफत मिळेल 2 आणि 4 लाखाचा फायदा; जाणून घ्या सविस्तर?

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 63 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Petrol Diesel Price | लवकरच 60 रुपये प्रति लीटर इंधनात धावणार तुमची कार! मोदी सरकारची विशेष योजना, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts