IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 63 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Great relief One digit number of corona patients in Pimpri Chinchwad know other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन  पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना (Pimpri Corona) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. शहरातील नवीन रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. त्याचबरोबर बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांच्या संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही शहरासाठी दिलासादायक बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 63 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 63 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Corona-infected patients) संख्या 2 लाख 76 हजार 404 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 64 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 72 हजार 179 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरामध्ये सध्या 464 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात शहरातील 1 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,492 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दिवसभरात 2707 जणांचे लसीकरण

 

गुरुवारी (दि.4) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 02 हजार 707 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 23 लाख 46 हजार 016 जणांना लस देण्यात आली आहे.(Pimpri Corona )

 

Web Title : Pimpri Corona | Diagnosis of 63 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pimpri Chinchwad, know other statistics

 

हे देखील वाचा :

Petrol Diesel Price | लवकरच 60 रुपये प्रति लीटर इंधनात धावणार तुमची कार! मोदी सरकारची विशेष योजना, जाणून घ्या सविस्तर

Viral Infection Mumbai | साथीच्या आजाराने डोकेदुखी वाढवली; आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू

Bhiwandi Crime | कामाच्या वादातून सहकाऱ्यानेच चिरला 18 वर्षीय तरुणाचा गळा

 

Related Posts