IMPIMP

Swachh Bharat Abhiyan | ऋतुजा भोसले, डॉ. सलील कुलकर्णी पुणे शहर ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

by nagesh
Swachh Bharat Abhiyan | Rituja Bhosle, Dr. Salil Kulkarni Pune City Brand Ambassador of 'Swachh Survekshan 2023'

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन विद्येचे व संस्कृतीचे माहेरघर असलेले पुणे शहर (Pune City) हे आता पर्यावरणाचे विकासघर बनत आहे. सलग दोन वर्षे पुणे शहराने राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये (Swachh Bharat Abhiyan) पहिल्या 10 क्रमांकात नामांकन मिळाले आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) विविध स्वच्छता उपक्रम आणि नागरिकांचा सहभागाचे उपक्रम राबवून पुणे शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केले जात आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता आणि वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी स्वच्छतेचे (Swachh Bharat Abhiyan) महत्व नामवंत व्यक्तींच्या मार्फत पटवून देऊन त्याचा प्रभावी परिणाम घडवून आणण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (Brand Ambassador) ची निवड केली जाते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गायक, संगित दिग्दर्शक, कवी व लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. सलील कुलकर्णी (Dr. Salil Kulkarni) व आंतरराष्ट्रीय टेनिसपटू ऋतुजा भोसले (International Tennis Player Rituja Bhosale) यांनी पुण्याची मान उंचावली आहे. म्हणूनच 2023 साली स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत (Swachh Bharat Abhiyan) एक जागरूक पुणेकर या नात्याने पुणेकरांमध्ये स्वच्छतेची भावना जागृक करण्यासाठी सलील कुलकर्णी आणि ऋतुजा भोसले यांची पुणे शहराचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (Solid Waste Management Department) उपायुक्त आशा राऊत (Deputy Commissioner Asha Raut) यांनी दिली.

 

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त Municipal Corporation Additional Commissioner
(इ) डॉ. कुणाल खेमनार (Dr. Kunal Khemnar) यांच्याहस्ते डॉ. सलील कुलकर्णी आणि ऋतुजा भोसले
यांचा पुष्पगुच्छ आणि नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आशा राऊत यांनी 2023 अंतर्गत ब्रँड अ‍ॅम्बेसेडर
यांच्या सोबत करण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती दिली.
तसेच जास्तीत जास्त नागरिकांमध्ये जनजागृती करुन पुणे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

 

 

Web Title :- Swachh Bharat Abhiyan | Rituja Bhosle, Dr. Salil Kulkarni Pune City Brand Ambassador of ‘Swachh Survekshan 2023’

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही; ते जेव्हा अस्वस्थ होतात तेव्हा… – चंद्रशेखर बावनकुळे

Prakash Ambedkar | काँग्रेस आणि शिवसेनेला युतीचा पर्याय दिला आहे, पण त्यांचे अजून उत्तर आले नाही – प्रकाश आंबेडकर

T20 World Cup | टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहच्या नंतर हा प्रमुख गोलंदाज विश्वचषकातुन बाहेर

 

Related Posts