IMPIMP

T-20 World Cup | रोहित शर्माने ‘या’ दिग्गज क्रिकेटरचा सल्ला ऐकला तर टीम इंडियाची कामगिरी उंचावेल

by nagesh
T-20 World Cup | team india will win t20 world cup 2022 says ravi shastri follow these steps sport news

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – टीम इंडिया टी 20 वर्ल्डकपसाठी (T-20 World Cup) ऑस्ट्रेलियामध्ये (Austrelia) दाखल झाली आहे. टीम इंडियाकडे 15 वर्षानंतर वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे. याअगोदर टीम इंडियाने 2007 साली महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendrasingh Dhoni) नेतृत्वाखाली हा वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपच्या अगोदर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) जखमी झाल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे या वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाची टीम इंडियाला नक्कीच उणीव भासणार आहे. यावेळी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी कर्णधार रोहित शर्मा याला एक सल्ला दिला आहे. (T-20 World Cup)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय दिला सल्ला?

‘टीम इंडियाकडे टी 20 वर्ल्डकप जिंकण्याची चांगली संधी आहे. भारतीय संघाने सुपर 12 फेरीत चांगली कामगिरी करावी आणि उपांत्य फेरीत धडक मारावी. जर असं झालं तर भारत नक्कीच वर्ल्डकप जिंकू शकतो. बुमराह आणि जडेजाची दुखापत एका नवीन चॅम्पियनची शोधण्याची संधी देईल.’, असा सल्ला माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी दिला आहे.

 

16 ऑक्टोबरपासून टी 20 वर्ल्डकपला (T-20 World Cup) सुरुवात होणार असून टीम इंडियाचा
पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत (Pakistan) 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
त्यामुळे भारताला उपांत्य फेरीत धडक मारण्याासाठी सुपर 12 फेरीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचा समावेश आहे.

 

Web Title :- T-20 World Cup | team india will win t20 world cup 2022 says ravi shastri follow these steps sport news

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘आमचा उत्स्फुर्त उठाव होता’ चंद्रकांत पाटलांच्या दाव्याला शिंदे गटाच्या मंत्र्याचे प्रत्युत्तर

MNS | उद्धव ठाकरेंकडून दीड वर्षीय बाळाचा उल्लेख, मनसेनं करुन दिली बाळासाहेबांची आठवण

Shanikrupa Heartcare Centre | संकल्प निरोगी हृदयाचा..!, शनिकृपा हार्टकेअर मधील योग्य तपासणीमुळे जीवन होईल सुरक्षित

 

Related Posts