IMPIMP

UP MLC Election Result 2022 | युपी विधान परिषदेतही भाजपचा मोठा विजय

by nagesh
BJP | several eknath shindes in trs telangana bjp chief hits out at kcr

लखनौ : वृत्तसंस्था UP MLC Election Result 2022 | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर भाजपने (BJP) पुन्हा
एकदा विजयाचा झेंडा फडकवला आहे. विधानसभेत बहुमतासोबतच आता भाजपला विधान परिषदेतही (UP MLC Election Result 2022) बहुमत
मिळाले आहे. विधानसभेत आणि विधानपरिषदेत एका पक्षाला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर 40 वर्षांनंतर राज्यात हे घडत आहे. यापूर्वी 1982 मध्ये
काँग्रेसला (Congress) दोन्ही सभागृहात बहुमत मिळाले होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

9 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत 36 पैकी 27 जागांवर भाजपने 24 जागा जिंकल्या आहेत. तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) खातेही अजुन उघडलेले नाही. भाजपच्या उमेदवारांनी 9 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवारांनी 9 जागा बिनविरोध जिंकल्या. आज (मंगळवारी) झालेल्या मतमोजणीत भाजपने 27 पैकी 24 जागा जिंकल्या आहेत. 3 जागा अपक्षांनी जिंकल्या. समाजवादी पक्षाचे खातेही उघडले नाही. सपाचा बालेकिल्ला असलेल्या आझमगडमध्येही पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. येथून भाजपमधून हकालपट्टी झालेले यशवंत सिंह (Yashwant Singh) यांचे पुत्र विक्रांत सिंह रिशू (Vikrant Singh Rishu) यांनी अपक्ष उमेदवाराच्या जोरावर विजय मिळवला आहे. (UP MLC Election Result 2022)

 

 

दरम्यान, 33 जागांवर विजय मिळवत भाजपला वरच्या सभागृहातही बहुमत मिळाले आहे. सध्या 100 पैकी भाजपचे 35 आमदार होते. 33 आमदारांच्या विजयामुळे ही संख्या 68 वर पोहोचली आहे, जी 51 च्या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त आहे.
समाजवादी पक्षाचे सध्या 17 आमदार आहेत. विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर आता कोणतेही विधेयक मंजूर करणे भाजप सरकारला सोपे होणार आहे.

 

 

Web Title : UP MLC Election Result 2022 | bjps big victory in the legislative council after the vidhan sabha a repeat of history after 40 years

 

हे देखील वाचा :

Pune Crime | छळाला कंटाळून विवाहितेची टेरेसवरुन उडी घेऊन आत्महत्या; कात्रज परिसरातील घटना

Dilip Walse Patil On Silver Oak Attack | पोलिस बंदोबस्ताबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले – ‘गुप्तचर विभागानं…’

Pune Crime | चिंचवड येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, सासूवर सत्तुरने वार

 

Related Posts