IMPIMP

Pune Crime | चिंचवड येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, सासूवर सत्तुरने वार

by nagesh
Pune Crime | Chain Snatching In Vishrantwadi Chowk Yerwada Pune

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | चिंचवड येथील (Chinchwad News) वाल्हेकरवाडी परिसरातील एकाने चारित्र्याच्या संशयावरून
पत्नीवर तसेच सासूवर देखील सत्तूरने वार केले (Pune Crime) आहे. या हल्ल्यात दोघी गंभीर जखमी (Seriously injured) झाल्या आहेत. याप्रकरणी
सुभाष नामदेव गायकवाड (Subhash Namdev Gaikwad) (वय 40, रा. नाव्हरे, ता. शिरुर, जि. पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून
त्याच्याकडून सत्तूर जप्त केला. त्याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही घटना काल (सोमवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. रुपाली सुभाष गायकवाड (Rupali Subhash Gaikwad) आणि मंगल दळवी (Mangal Dalvi) असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान याप्रकरणी दीपमाला लक्ष्मण कोर्टेकर (Deepmala Laxman Kortekar) (वय 39, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी सोमवारी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी यांची बहीण रुपाली आणि आरोपी सुभाष गायकवाड हे पती – पत्नी आहेत. तसेच जखमी झालेल्या मंगल दळवी या फिर्यादी आणि रुपाली यांच्या आई आहेत. आरोपीने पत्नी रुपाली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यात सत्तूराने वार करून गंभीर जखमी केले. त्यावेळी मंगल दळवी या रुपाली हिला सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपीने तिलाही जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्याही डोक्यात व हातावर वार करून गंभीर जखमी केले. असे फिर्यादीत म्हटलं आहे.

 

दरम्यान, या घटनेनंतर जखमी रुपाली आणि त्यांच्या आई मंगल दळवी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यानंतर दीपमाला कार्टेकर यांनी फिर्याद दिली.
आरोपीवर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करून त्याला ताब्यात (Arrested) घेण्यात आले आहे.
याप्रकरणी अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | sattur stabs wife mother in law on suspicion of character crime news

 

हे देखील वाचा :

PM Jan Dhan Yojana (PMJDY) | बँक खात्यात पैसे नसले तरी देखील वेळप्रसंगी मिळतील 10 हजार रुपये; जाणून घ्या योजना

FDA Pune | पुणे विभागातील 392 औषध दुकानांचे परवाने निलंबित, 105 दुकानांना टाळे; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

MSEDCL | राज्यावर वीज संकट? गुजरातची कंपनी म्हणते आधी 120 कोटींची थकबाकी द्या तरच वीज देऊ

 

Related Posts