IMPIMP

Urmila Matondkar | उर्मिला मातोंडकरांचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या – ‘अभिनंदन! आनंद आहे ‘लोकशाही’ वाचली याचा, पण…’

by nagesh
Urmila Matondkar | urmila matondkar criticized on devendra fadnavis on supreme court cancels suspension of 12 maharashtra bjp mlas

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Urmila Matondkar | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांना निलंबित (12 BJP MLAs Suspended) करण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गदारोळ माजवल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) भाजपच्या 12 आमदारांना दिलासा आहे. तर ठाकरे सरकारला (Thackeray Government) धक्का मानला जात आहे. न्यायालयाने 12 आमदारांचं निलंबन रद्द केल्यानतंर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी न्यायलयाच्या निर्णयाचे स्वागत करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी पलटवार केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”अभिनंदन! आनंद आहे ‘लोकशाही’ वाचली याचा…पण अध्यक्ष महोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे, त्यावरही शेभेकरता का असेना कधी तरी आवाज उठवा. इथे फक्त 50 लाख नाही तर महाराष्ट्राच्या तमाम 12 करोडपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे”, असं ट्विट करत उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

काय म्हणाले होते फडणवीस?
”राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार! या निकालाचे आम्ही स्वागत करतो.
तसेच, निलंबन रद्द झाल्याबद्दल भाजपाच्या 12 आमदारांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
कुठलेही कारण नसताना आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी निलंबन हे असंवैधानिक आहे, केवळ कृत्रिम बहुमतासाठी ते करण्यात आले,
हे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. आज न्यायालयाने तेच सांगितले.
हा केवळ 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता तर त्या मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता.
आज लोकशाहीचे संरक्षण झाले,” असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Urmila Matondkar | urmila matondkar criticized on devendra fadnavis on supreme court cancels suspension of 12 maharashtra bjp mlas

 

हे देखील वाचा :

Union Budget 2022 | यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पेन्शनधारकांसाठी खूशखबर; पेन्शनमध्ये वाढ होणार?

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घट तर चांदी 1100 रुपयांनी घसरली; जाणून घ्या नवीन भाव

Nora Fatehi Viral Photo | नोरा फतेहीच्या ‘या’ अनोख्या फोटोनं बोल्ड इमेजला दिली टक्कर, फोटो पाहून चाहते झाले ‘घायाळ’

 

Related Posts