IMPIMP

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! सिंहगड इलेव्हन संघाची विजयी सलामी

by nagesh
Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | 'Vision Cup' Championship Cricket Tournament! Winning opening of Sinhagad XI team

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | व्हिजन स्पोर्ट्स सेंटर तर्फे आयोजित ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद एकदिवसीय (५० षटके) क्रिकेट स्पर्धेत सिंहगड इलेव्हन संघाने रायगड इलेव्हनचा पराभव करत विजयी सलामी दिली. (Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सनसिटी रोड येथील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी मैदानावर झालेल्या सामन्यात शाम यादव याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर सिंहगड इलेव्हन संघाने रायगड इलेव्हन संघाचा ४ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना रायगड इलेव्हनने १४४ धावा धावफलकावर लावल्या. श्रेयस काकडे याने ६२ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. शाम यादव याने २९ धावात रायगडचा निम्मा संघ बाद करत चमकदार गोलंदाजी केली. विकास सहानी (२-३०) आणि स्वप्निल ए. (२-१८) यांनीही दुसर्‍या बाजून साथ दिली. हे आव्हान सिंहगड इलेव्हनने २४ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. कुणाल चौहान याने ५७ धावांची खेळी केली. शाम यादव याने गोलंदाजीसह फलंदाजीमध्येही योगदान देत ४४ धावा काढल्या. (Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament)

 

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि संयोजक गणेश जोशी यांनी सांगितले की, १६ ते २५ वयोगटातील युवा क्रिकेट खेळाडूंसाठी तसेच त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी, संधी देण्यासाठी व्हिजन करंडक या ५०-५० षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीमधील खेळाडुंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण ३ संघ सहभागी झाले आहेत. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्‍या या स्पर्धेत रायगड इलेव्हन, सिंहगड इलेव्हन आणि सिंधूदुर्ग इलव्हेन या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

 

स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघाला आकर्षक बक्षिस व करंडक मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज,
गोलंदाज आणि यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना प्रत्येकी करंडक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

रायगड इलेव्हनः ३०.४ षटकात १० गडी बाद १४४ धावा (श्रेयस काकडे ६२ (६३, १० चौकार, १ षटकार),
शिवराम यादव २१, शाम यादव ५-२९, विकास सहानी २-३०, स्वप्निल ए. २-१८) पराभूत
वि. सिंहगड इलेव्हनः २४ षटकात ६ गडी बाद १४७ धावा (कुणाल चौहान ५७ (५७, १० चौकार),
शाम यादव ४४ (४०, ९ चौकार), हेमंत वाईकर २७, दिग्वीजय पाटील १-८); सामनावीरः शाम यादव;

 

 

Web Title :-   Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘Vision Cup’ Championship Cricket Tournament! Winning opening of Sinhagad XI team

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | उद्धव ठाकरेंच्या ‘फडतूस गृहमंत्री’ वक्तव्यावरुन भाजप नेते आक्रमक, म्हणाले -‘आमचे गृहमंत्री ‘फडतूस’ नाही ‘काडतूस’ आहेत’

Devendra Fadnavis | ‘उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…’, देवेंद्र फडणवीसांचा इशारा (व्हिडिओ)

Darayasarang Marathi Movie | सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘दर्यासारंग’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

 

Related Posts