IMPIMP

Devendra Fadnavis | ‘उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…’, देवेंद्र फडणवीसांचा इशारा (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis answer criticism of uddhav thackeray over thane woman beating case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – ठाण्यात ठाकरे गटाच्या (Thackeray Group) महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून (Shinde Group) मारहाण झाली. यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. ठाकरे यांनी फडणवीसांचा ‘फडतूस गृहमंत्री’ असा उल्लेख करत गृहमंत्रीपदाचा राजीनामा (Resignation) द्यावा अशी मागणी केली. यावर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं असा इशारा दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. माझा प्रश्न असा आहे की, दोन-दोन मंत्री तुरुंगात गेल्यावर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवत नाहीत. त्या मंत्र्यांभोवती लाळ घोटत असतात अशांना बोलण्याचा काय अधिकार आहे.

 

आमचं तोंड उघडलं तर त्यांना…

जे वाझेच्या (Sachin Vaze) मागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. ज्यांच्या काळात पोलीस खंडणी (Extortion) वसूल करतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. अडीच वर्षे घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असा नाही, असा इशारा फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

 

खरा फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहिती

ज्या दिवशी बोलणं सुरु करेन त्या दिवशी त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यामुळे त्यांनी संयमाने बोलावं. त्यांचा थयथयाट आणि निराशेला उत्तर देण्याचं कारण नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींचा (PM Narendra Modi) फोटो लावून निवडून येतात आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटतात. फक्त खुर्चीसाठी ते लाळघोटेपणा करतात, मग खरा फडतूस कोण? याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

 

मी पण नागपूरचा आहे

ते जितक्या खालच्या भाषेत बोलले, त्यापेक्षा खालच्या पातळीची भाषा मला येते. मी पण नागपूरचा आहे. मात्र, मी तसं बोलणार नाही. कारण तसं बोलण्याची माझी पद्धत नाही. या निमित्ताने मी एवढंच सांगतो की, त्याचं उत्तर त्यांना जनता देईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मी गृहमंत्रीपद सोडण्याची वाट बघत आहेत

पाच वर्षे राज्याचा गृहमंत्री (Home Minister) राहिलो आहे. आता पुन्हा गृहमंत्री आहे. मला याची कल्पना आहे की, मी गृहमंत्री असल्यामुळे अनेक लोकांना अडचणी होत आहेत. ते पाण्यात देव ठेवून बसले आहेत की मला गृहमंत्रीपद कसं सोडावं लागेल. पण मी त्यांना सांगतो मी गृहमंत्रीपद सोडणार नाही, तुमच्या मेहरबानीने गृहमंत्री नाही, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये गृहमंत्री आहे. तसेच जो कुणी चुकीचं काम करेल त्याला मी जेल मध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले.

 

 

त्यावेळी समजायचं राजा काम करतोय

तुम्हाला टार्गेट केलं जातंय का असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, चाणक्य एकदा म्हणाले होते की ज्यावेळी राज्यातील चोर, डाकू, लुटेरे किंवा अपप्रवृत्तीचे लोकं हे राजाच्या विरोधात बोलतात.
तेव्हा समजायचं राजाने योग्य काम चालू केलं आहे. मी राजा नाही.
पण तुमच्या लक्षात येत असेल चाणक्य जे म्हणाले तेच खरं होताना दिसत आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

 

 

तर त्यांच्यावर कारवाई करणार

उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करा किंवा त्यांना निलंबित करा अशी मागणी केली आहे.
यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकादी घटना घडली तर त्याची निष्पक्ष चौकशी आमचं सरकार करेल.
पण त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न कोणी करु नये.
राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य देखील होणार नाही. त्यामुळे त्यासंदर्भातही उचित चौकशी होईल.
जे घडलं असेल, कोणी चुक केली असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-   Devendra Fadnavis | devendra fadnavis answer criticism of uddhav thackeray over thane woman beating case

 

हे देखील वाचा :

Darayasarang Marathi Movie | सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘दर्यासारंग’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Ashish Shelar | ‘वज्रमूठ’ नव्हे, ही तर 16 चोरांची ‘हात मिळवणी’!, भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडिओ)

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! माणिकचंद ऑक्सिरीच बाद फेरीत; संदीप हिरोज् संघाची विजयी सलामी

 

Related Posts