IMPIMP

OBC Reservation | ‘पवार कुटुंब राज्यातील ओबीसींचा कर्दनकाळ’, भाजप आमदाराचा घणाघाती आरोप

by nagesh
Gopichand Padalkar | maybe sharad pawar is saying all this through the mouth of jitendra awhad gopichand padalkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला (OBC Reservation) स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे राज्यात आरोप प्रत्यारोपांचं घमासान सुरु झालं आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) राज्य सरकारवर (Maharashtra Government) आरोप केले आहेत. ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट या सरकारचा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ओबीसी समाज सरकारवर नाराज असल्याचे देखील पडळकर यांनी सांगितले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पवार कुटुंब आरक्षण विरोधी

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, राज्य सरकारने आधी पदोन्नतीचे आरक्षण रद्द करुन आपण एससी (SC), एसटी (ST), ओबीसी (OBC), भटक्या विमुक्त जाती विरोधात आहोत हे दाखवून दिले आहे. ओबीसी आरक्षण (OBC Reservation) विरोधात शरद पवार यांचे कुटुंबीय (Sharad Pawar family) असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. उद्या शैक्षणिक आरक्षण (Educational reservation) ही संपवतील असा घाणाघाती आरोप पडळकर यांनी केला आहे.

 

मग राज्य कशाला चालवता

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यावरही टीका केली.
सुप्रीम कोर्टाने इम्परिकल डाटा (Imperial data) जमा करा असे
केंद्र सरकारला (Central Government) सांगितले नाही.
प्रत्येक गोष्ट केंद्राने करावी असं वाटत असेल तर मग राज्य कशाला चालवत आहात,
असा सवाल त्यांनी केला. तुम्हाला काम करता येत नसेल आणि रोज उठून केंद्राकडे बोट दाखवत असाल
तर राज्य केंद्राकडे देऊन टाका असेही पडळकर यांनी म्हटले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पवार कुटुंब ओबीसींचा कर्दनकाळ

राज्यातील ओबीसींचा कर्दनकाळ पवार कुटुंब आहे असा गंभीर आरोप करत या समितीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) कसे काय असू शकतात? असा गंभीर सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. पदोन्नतीच्या बाबतीत जे केलं ते आता पवार कुटुंब ओबीसी समाजाच्या बाबतीत करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच ओबीसींचा नेमका शत्रू कोण हे आता ओळखलं पाहिजे असे सांगत भाजप ओबीसी आरक्षणाचा प्रश्न यापुढेही मांडत राहिल आणि यासंदर्भात आंदोलन करत राहू असे पडळकर यांनी सांगितले.

 

Web Title :- OBC Reservation | obc reservation row bjp mla gopichand padalkar criticized on sharad pawar family over stay on obc reservation

 

हे देखील वाचा :

Ahmednagar News | प्रेरणादायी ! कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलेला तरुणाने दिला आयुष्यभराचा ‘आधार’, अहमदनगर जिल्ह्यातील घटना

Pune Crime | ‘बर्थडे’ पार्टीसाठी 22 वर्षीय तरूणीला तळजाई जंगल परिसरात नेलं, दारू ढोसल्यानंतर युवतीला थंडी जाणवली; तिथंच साईडला झोपवून बलात्कार

LIC Policy | एलआयसी पॉलिसीधारकांसाठी महत्वाची सूचना, तात्काळ उरकून घ्या ‘हे’ महत्वाचे काम; अन्यथा…

 

Related Posts