IMPIMP

WhatsApp च्या कोणत्याही वाईट मेसेजबद्दल तुम्ही तक्रार कशी कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

by nagesh
Bug In Whatsapp | cert issued alert regarding dangerous bug in whatsapp threat of data leak hovered

नवी दिल्ली : वृत्तसंस्था WhatsApp | भारतामध्ये मेसेज पाठवण्यासाठी WhatsApp चा सर्वाधिक वापर केला जातो. या अ‍ॅपव्दारे लोक त्यांची माहिती व प्राइवेट मेसेजची देवाणघेवाण करतात. तसेच, तुम्हाला जर व्हॉट्सअ‍ॅपवर काही अश्लील व धमक्या देणारे मेसेज येत असतील तर तुम्ही तक्रार करू शकता. तक्रार केल्यानंतर काही दिवसातच त्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर कारवाई केली जाईल. जर तुम्हालाही अशा मेसेजची तक्रार कशी करायची हे माहीत नसेल, तर ही बातमी तुमच्या कामी येऊ शकते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

यापूर्वीही चॅट मेसेजची तक्रार करण्याची सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवर देण्यात आली होती. परंतु आता जर तुमच्याकडे असा एखादा संदेश असेल जो तुम्हाला अश्लील वाटत असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. याआधी एकाच मेसेजबद्दल तक्रार करता येत नव्हती परंतु आता ते शक्य झाले आहे.

एका संदेशाची तक्रार कशी करावी –

– सर्व प्रथम ते चॅट ओपन करा व तुम्हाला रिपोर्ट करायचा मेसेज शोधा.

आता त्या मेसेजवर थोडावेळ दाबून धरा व तुम्हाला तीन डॉट दिसतील.

आता या डॉटवर टॅप करा आणि रिपोर्ट पर्यायावर क्लिक करा.

यानंतर, तुम्हाला कन्फर्मेंशनसाठी पुन्हा रिपोर्ट बटणावर क्लिक करावे लागेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

WhatsApp नंबरची तक्रार कशी करावी –

प्रथम कॉन्टेक्ट नंबर शोधा ज्याला रिपोर्ट करायचा आहे.

आता चॅट बॉक्समध्ये, वरच्या उजव्या बाजूला दिसणार्‍या तीन डॉटवर क्लिक करा.

त्यानंतर More बटणावर क्लिक करा आणि रिपोर्ट पर्यायावर क्लिक करून रिपोर्ट देऊ शकता.

 

तुम्ही अशी देखील तक्रार करू शकता.

तुम्हाला कोणत्याही वाईट संदेशामुळे त्रास होत असेल, तर त्याबद्दल तक्रार करण्यासाठी तुम्हाला त्या WhatsApp अकाउंटचा नंबर आणि मेसेजचा स्क्रीनशॉट [email protected] वर मेल करावा लागेल. त्यानंतर दूरसंचार विभाग या अपमानास्पद/आक्षेपार्ह/ जीवे मारण्याच्या धमक्या/अश्लील संदेशांची दखल घेईल.

 

Web Title :- WhatsApp | how can you complain about any whatsapp message know the complete process

 

हे देखील वाचा :

Jay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं गाणं, अतिशय गोड व्हिडीओ तुफान व्हायरल

Ramnath Kovind | रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास शिवप्रेमींचा विरोध ! राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतला मोठा निर्णय

How To Become Crorepati | फक्त 15,000 रुपये महिना गुंतवणुकीतून बनू शकता करोडपती, जाणून घ्या काय आहे फार्म्युला

 

Related Posts