IMPIMP

Winter Session 2022 | कर्नाटक सीमाप्रश्नी विरोधक आक्रमक; विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धरले सरकारला धारेवर…

by nagesh
Winter Session 2022 | maharashtra assembly winter session 2022 cm eknath shinde reply opposition leader ajit pawar over maharashtra karnataka border issue

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022 ) नागपूर येथे सुरू झाले आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने सरकारला कर्नाटक सीमावादावरून (Maharashtra–Karnataka Border Issue) धारेवर धरले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सीमावर्ती भागात कुठलीही हलचाल न करण्यावर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली होती. तरीही सीमावर्ती भागात कर्नाटक सरकारकडून मराठी नेत्यांच्या धरपकडीची मालिका सुरूच आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. (Winter Session 2022)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवारांच्या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या सीमावादावर केलेल्या विधानावर आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडीवर हल्ला बोल केला. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे ट्वीटर अकाऊंट फेक असल्याचा पुनरूच्चार करत त्यांनी बोम्मईंची पाठराखन केली आहे. आणि बोम्मई यांचे ते ट्वीटर अकाऊंट फेक असून त्या अकाऊंटवरून कुणी ट्वीट केले आणि कोणत्या पक्षाशी ते संबंधित आहेत. याची माहिती पोलिसांना कळली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना सांगितले.

 

सीमाप्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘सीमाप्रश्न काय आमचं सरकार आल्यावरचं उद्भवला अशातली गोष्ट नाही. पण तरीही हा प्रश्न निपटायला आमचे सरकार खंबीर आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासात सीमाप्रश्नी पहिल्यांदाच केंद्राने एवढी रोखठोक भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या रूपाने याप्रकरणी केंद्राने देखील याप्रश्नी हस्तक्षेप केला आहे. त्यांनी कर्नाटक सरकारला याप्रकरणी समज देखील दिली आहे. ते ट्वीट मी केले नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री अमित शहा यांच्यासमोर सांगितले आहे. आणि ते ट्वीट कुणी केले, त्याचा कोणत्या पक्षाशी संबंध आहे, याची माहिती पोलिसांना समजली आहे.’ असे सांगतानाच बोम्मई यांचे ते ट्वीटर अकाऊंट फेक असल्याची माहिती देखील यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिली. (Winter Session 2022)

 

तसेच सीमावादावर राजकारण होत असल्याचा दावा करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या उध्दव ठाकरे
आणि काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. तसेच छगन भुजबळ आंदोलनासाठी कर्नाटकात गेले असता त्यांनी
लाठ्या काठ्या खाल्ल्या. आणि त्यांच्यासोबत आम्हीदेखील खाल्ल्या.
आत्ता जोरोजोरात आवाज उठवणारे त्यावेळी कुठे गेले होते? तसेच सत्तेत असताना सीमावासियांचा निधी
कुणी लांबवला? असे बोलत त्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाना साधला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Winter Session 2022 | maharashtra assembly winter session 2022 cm eknath shinde reply opposition leader ajit pawar over maharashtra karnataka border issue

 

हे देखील वाचा :

Health Tips | फळांवर मीठ टाकणे आरोग्याच्या दृष्टीने पडू शकते महागात, खाल्ल्याने होऊ शकते नुकसान

Ajit Pawar | लवासा प्रकरणी अजित पवारांचे सरकारला आव्हान, म्हणाले- ‘तर सर्व यंत्रणा कामाला लावून आमची…’

Aaditya Thackeray | घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान दिले, पण त्यांनी… – आदित्य ठाकरे

 

Related Posts