IMPIMP

DCP Saurabh Tripathi | वसुली प्रकरणात IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी निलंबित

by nagesh
IPS Saurabh Tripathi | angadia extortion case dcp ips saurabh tripathi pre arrest bail application rejected

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनअंगडिया खंडणी प्रकरणी (Angadiya Extortion Case) IPS अधिकारी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (DCP
Saurabh Tripathi) यांना निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (DCP Saurabh Tripathi) यांना निलंबित
करण्यासाठी महाराष्ट्राच्या गृह विभागाने (Maharashtra Home Department) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (DCP Saurabh Tripathi) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल झाला तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. 16 मार्च रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) त्यांना फरार घोषित (Wanted Accused) केले आहे. त्यांना फरार घोषित केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या वसुली प्रकरणाची माहिती गृह मंत्रालयाला दिली होती. तसेच त्रिपाठी यांच्याविरोधात कोणते पुरावे सापडले असून त्यांच्यावर विभागीय कारवाई का करावी, हेही सांगण्यात आले होते. या प्रकरणी त्रिपाठी यांनी तक्रारदार यांना फोन करुन तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचाही आरोप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत काही ऑडिओ क्लिपही (Audio Clip) मुंबई पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.

 

त्रिपाठींची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

या प्रकरणी सौरभ त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी (Pre – Arrest Bail) सत्र न्यायालयात (Sessions Court) धाव घेतली आहे. अटकपूर्व जामीन अर्जात त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी एफआयआरमध्ये त्यांचे नाव नमूद करण्यात आले नव्हते. पोलीस स्टेशन (Police Station) स्तरावर अंगडियाकडून पैसे वसूल केले जात असल्याची माहितीही त्यांना नव्हती. त्यांच्या जामीन अर्जावर 23 तारखेला सुनावणी होणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

चार आरोपींवर गुन्हा तिघांना अटक
अंगडियाकडून वसुली प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत 4 जणांवर गुन्हा दाखल करुन तीन अधिकाऱ्यांना अटक (Arrest) केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम (API Nitin Kadam) आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे (PSI Samadhan Jamdade) आणि पोलीस निरीक्षक ओम वंगाटे (Police Inspector Om Wangate) या तीन अधिकाऱ्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यानंतर सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल केला. यानंतर आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 

Web Title :- DCP Saurabh Tripathi | ips officer saurabh tripathi sacked in recovery case now suspended

 

हे देखील वाचा :

MP Supriya Sule | मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यातील 24 गावच्या वाड्या वस्त्यांवर विजेसाठी 12 कोटी मंजूर

Gully Boy Fame Rapper Dharmesh Dies | ‘Gully Boy’ या चित्रटातील प्रसिद्ध रॅपर धर्मेश परमार मृत्यू; 24 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vitamin D Deficiency | शरीरात ‘व्हिटॅमिन-डी’ची कमतरता ‘या’ मोठ्या आजाराला देऊ शकते निमंत्रण, 6 सुपर फूड्सचा आजच डाएटमध्ये करा समावेश

 

Related Posts