IMPIMP

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, पुण्यातही धारा बरसणार

by pranjalishirish
Maharashtra Monsoon Rains | maharashtra monsoon rain updates monsoon konkan mumbai news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आणखी चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. राज्यात 18 ते 20 मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस rain  पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. दरम्यान आगामी दोन दिवस शहरात अंशत: ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुढील दोन दिवस पुण्यासहित आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहणार असून, दुपारनंतर अथवा संध्याकाळी ढगाळ वातावरण निर्माण होईल. हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार, शहरात 36.6 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान तर 16.3 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्राकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि दक्षिणेकडून वाहणारे वारे एकत्र आल्याने होणाऱ्या अंतरक्रियेच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी rain अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 18 ते 20 मार्चदरम्यान मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही भागात मेघगर्जनेसह पाऊस rain पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Also Read : 

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक ! भाजपच्या गडाला मोठं भगदाड, आणखी 5 जण शिवबंधनात

मनसुख हिरेन प्रकरण : CDR वरून काँग्रेसने फडणवीसांना घेरले, म्हणाले…

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक ! भाजपच्या गडाला मोठं भगदाड, आणखी 5 जण शिवबंधनात

मंत्रिमंडळातील फेरबदलाविषयी एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

धक्कादायक ! मराठी भाषेचे स्टेट्स ठेवले म्हणून चौघांना मारहाण, कानडी पोलिसांची गुंडगिरी

भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन स्वत:च्याच जिल्ह्यात संकटात

Related Posts