IMPIMP

जसप्रीत बुमराह अडकला विवाह बंधनात; TV अँकर संजना गणेशनसोबत घेतले 7 फेरे

by bali123
jasprit bumrah married with tv anchor and commentator sanjana ganesan

सरकारसत्ता ऑनलाइन – टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह jasprit bumrah विवाह बंधनात अडकलेला आहे. सोमवारी त्याने टीव्ही अँकर संजना गणेशनसह सात फेर्‍या घेतल्या. जसप्रीत बुमराह jasprit bumrah यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करुन याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराह आणि संजनाच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.

बुमराह आणि संजनाने एका खाजगी कार्यक्रमात लग्न केले आहे. ज्यात त्यांचे कुटुंब आणि जवळचे मित्र होते. जसप्रीत बुमराह यांनी ट्वीट केले की, आपण सक्षम असल्याचे आपल्याला वाटत असल्यास प्रेम आपले नशीब बदलवते. प्रेमाने आपल्याला घडवून आणलं, आम्ही एकत्र नवीन प्रवास सुरू करत आहोत. बुमराहने पुढे असंही लिहिले की, आजचा दिवस हा आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. आणि आम्ही आमच्या लग्नाची आणि आनंदाची बातमी तुमच्याबरोबर शेअर करत आहोत.

बुमराह आणि संजनाच्या लग्नाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. पण, टीम इंडियाच्या या वेगवान गोलंदाजाने सोमवारी ट्विट करून सर्व तर्कविर्तकांना पूर्णविराम दिला. बुमराहने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयकडून रजा मागितली होती. वैयक्तिक कारणास्तव त्याने रजा घेतली. नंतर इंग्लंड विरुद्धच्या टी -20 मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

त्याचवेळी बीसीसीआयच्या एका सूत्रांनी एएनआयला सांगितले की, बुमराहने बीसीसीआयला सांगितले होते की, आपण लग्न करणार आहोत आणि त्या तयारीसाठी त्यांना सुट्टीची गरज आहे.

संजना बुमराहपेक्षा कमी लोकप्रिय नाही :
सन 2014 मध्ये संजना गणेशन हिने मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले होते. आणि ती एमटीव्हीचा लोकप्रिय शो स्प्लिट्सविला या 7 व्या सत्रात सहभागी झाली होती. मागील काही वर्षांपासून संजना क्रिकेट प्रस्तुतकर्त्याची भूमिका साकारत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या कोलकाता नाइट रायडर्स फ्रँचायझीशी ती संबंधित आहे.

संजना ही मॅनेजमेंट गुरू गणेशन रामास्वामी यांची मुलगी आहे. रामस्वामी पुणे येथील अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसचे संचालक आहेत. संजनाने सिम्बायोसिस इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथून सॉफ्टवेअर अभियंता पदवी प्राप्त केली आहे. अभियांत्रिकीनंतर तिने मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला आहे.

शरद पवार अन् मुख्यमंत्र्यांचं ठरलं ! राज्याला मिळणार नवा गृहमंत्री ? अजित पवार यांच्यासह ‘या’ नावाची जोरदार चर्चा

पवार अन् मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीनंतर मंत्री मंडळात फेर बदलाचे ‘संकेत’; गृहमंत्रीपदी नवीन मंत्र्याची नियुक्ती केली जाण्याची शक्यता

PPE किट घातलेली व्यक्ती वाझे की आणखी कुणी ?, NIA वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार, गूढ उलगडणार?

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेते अन् मंत्र्याची बैठक, ‘या’ 3 महत्वाच्या प्रकरणांचा घेणार आढावा

Related Posts