IMPIMP

Aaditya Thackeray – Amit Thackeray | आदित्य-अमित ठाकरेंमध्ये रंगला सामना, ”मी सुपारीवाल्या पक्षांबाबत बोलणार नाही, कारण…”

by sachinsitapure

मुंबई : Aaditya Thackeray – Amit Thackeray | शिवसेना वर्धापनदिनाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. मनसेने (MNS) लोकसभा निवडणुकीत भाजपाला (BJP) दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याला उद्धव ठाकरेंनी बिनशर्ट पाठिंबा म्हणत मनसेची खिल्ली उडवली होती. यानंतर अपेक्षेप्रमाणे मनसेकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

आता अमित ठाकरे यांच्या प्रत्युत्तरावर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसेला डिवचल्याने ठाकरेंच्या पुढील पिढीत सामना रंगला आहे.

अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बिनशर्ट पाठिंब्याचा टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, आम्ही विधानसभेला आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. पण गेल्या चार-साडेचार वर्षांत त्यांनी काम केलेले नाही. कोरोना काळातही त्यांनी काहीच काम केले नाही. तुम्ही लोकांशी चर्चा केली तर त्यांच्याकडूनही हेच ऐकायला मिळेल. (Shivsena UBT)

अमित ठाकरे म्हणाले, अशा अपेक्षेने आम्ही विधानसभा निवडणुकीत त्यांना पाठींबा नव्हता दिला. दरम्यान, अदित्य ठाकरे यांनी २०१९ मध्ये वरळीतून विधानसभा निवडणूक लढवली असताना मनसेने त्यांचा उमेदवार उभा न करता अदित्य ठाकरेंना पाठिंबा दिला होता.

अमित ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, मी सुपारीवाल्या पक्षांबाबत बोलणार नाही. कारण पक्ष असे असतात जे निवडणूका आल्यावर बाहेर येतात, स्टंट करतात, आणि पुन्हा जातात. दरम्यान, आदित्य यांच्या या टीकेमुळे ठाकरे कुटुंबातील पुढच्या पिढीत विधानसभा निवडणुकीपूर्वीच वाद पेटल्याचे दिसत आहे.

Related Posts