IMPIMP

Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या

by sachinsitapure

मुंबई: Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून ‘महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश’ या मथळ्याखाली एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींचा उल्लेख केला. त्यासंदर्भात विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या टीकेवर त्यांनी भाष्य केले आहे. (Maharashtra Budget 2024)

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1808690326980157868

विधिमंडळात अजित पवारांनी नुकताच राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या असून त्यावरून सध्या विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. विशेषतः आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. (Maharashtra Monsoon Session)

या पार्श्वभूमीवर आज सकाळी अजित पवारांनी विशेष व्हिडीओ संदेश जारी केला असून त्यातून विरोधकांच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले, ” मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला आहे. असा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला लाभलं याचा मला सार्थ अभिमान आहे. या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. (Mazi Bahin Ladki Yojana)

आजवर आपण पाहात आलोय की प्रत्येक कुटुंबातील आई स्वतःवरील खर्चाची काटकसर करून मुलांना काही कमी पडणार नाही याची काळजी घेत असते. पण आर्थिक अडचणींमुळे कधीकधी घरातल्या मुलींकडे दुर्लक्ष होतं. पण या योजनेमुळे राज्यातील माता-भगिनींची ही विवंचना दूर होईल. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील”, असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “अनेक नकारात्मक लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत. त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचे सांगितले जात आहे. काहींकडून तर या अर्थसंकल्पाला लबाडा घरचं अवताण आणि यासारखी बरीच नावं ठेऊन हिणवलं जात आहे. मला इतकंच सांगायचं की या लोकांमध्ये आणि माझ्यामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणारे आहेत. आणि तुमचा दादा काम करणारा आहे.

मी गोरगरीब जनतेला तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्याबदल्यात मला शिव्याशाप मिळत आहेत. माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांच्या अडचणी, वेदना समजून घेतल्या. सरकारी योजनेच्या माध्यमातून त्यांच्यावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्पात आम्ही ४४ लाख शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केलं आहे म्हणून विरोधक मला शिव्याशाप देत आहेत “, असे अजित पवार म्हणाले.

Related Posts