IMPIMP

Ajit Pawar On Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादी विधानसभेच्या किती जागा लढणार?; बैठकीत अजित पवारांकडून मोठा दावा

by sachinsitapure

मुंबई: Ajit Pawar On Maharashtra Assembly Election 2024 | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि आमदारांची बैठक काल (दि.२) पार पडली. अजित पवारांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यासह इतर नेते हजर होते.

या बैठकीत राष्ट्रवादी आगामी विधानसभा निवडणूक महायुतीतून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत राष्ट्रवादी जवळपास ८५ जागांवर निवडणूक लढणार असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

याचबरोबर, या बैठकीत अजित पवार यांनी थेट निवडणुकीच्या तयारीला लागा, मित्र पक्षांसोबत वादग्रस्त विधाने टाळा, असे सर्व आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते यांना सांगितले आहे. याशिवाय, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा. लाडली बहीण, बसमध्ये महिलांना अर्ध्या दरात तिकीट तसेच इतर लोक कल्याणकारी योजना जनतेसाठी महायुतीच्या सरकारने सुरु केल्या आहे. त्या योजनांचा प्रचार आणि प्रसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये करावा, असे अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये (Mahayuti) विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा लढवणार, यावरून रस्सीखेच सुरु आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे काही नेते जागा वाटपाबाबत विविध दावे करत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पक्ष ८० जागा लढवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या कालच्या बैठकीत विधानसभेच्या ८५ जागा लढवण्याचा निर्णय झाला असला तरी आता महायुतीतील भाजप आणि शिवसेना याबाबत काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts