IMPIMP

Ambadas Danve Suspended For Five Days | सभागृहात शिवीगाळ करणे भोवले; अंबादास दानवे पाच दिवसांसाठी निलंबित

by sachinsitapure

मुंबई: Ambadas Danve Suspended For Five Days | सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे (Maharashtra Monsoon Session). सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याचाही आरोप आमदार लाड यांनी केला. यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हे निलंबन पाच दिवसांसाठी असेल. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी निलंबनाची घोषणा केली. तर चंद्रकांत पाटील यांनी निलंबनाचा ठराव विधान परिषदेत मांडला. त्यानंतर विधान परिषदेत जोरदार गदारोळ झाला. दानवेंना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र अशा ठरावावर चर्चा होत नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. त्यावेळी सभागृहात एकच गोंधळ झाला. शिवाय विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा सत्ताधारी आमदारांनी विधानपरिषदेत मांडला. या मुद्द्यावरून सभागृहात जोरदार गोंधळ सुरु झाला. राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या विधानावरुन विधान परिषदेत चर्चा सुरू झाली होती. यावरुन भाजपा आमदार प्रसाद लाड विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे बोट करुन बोलत होते.

यावेळी अंबादास दानवे जाग्यावरुन उठले आणि म्हणाले, सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे हे वक्तव्य ज्यांचं असेल त्याचं ते लोकसभेत झालेलं आहे. त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का? असा सवालही दानवे यांनी केला. दानवे यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी गटातील आमदारांनी गोंधळ सुरू केला. यावेळी अंबादास दानवे यांचा तोल सुटल्याचे पाहायला मिळाले.

Related Posts