IMPIMP

Bachchu Kadu On BJP | उमेदवार शिंदेंचा पण उमेदवारी द्यायची की नाही ठरवते भाजपा, अफलातून कारभार; बच्चू कडूंचा टोला

by sachinsitapure

मुंबई: Bachchu Kadu On BJP | लोकसभा निवडणूका पार पडल्या आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकांची लगबग सुरु झालेली आहे. महायुती (Mahayuti) एकत्रित विधानसभा (Maharashtra Assembly Elections 2024) निवडणुका लढणार असल्याचे बोलले जात आहे. तर लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरुन अजुनही चर्चा सुरू आहेत.

आमदार बच्चू कडू यांनी आज जागावाटपावरुन भाजपावर जोरदार निशाणा साधला. “हिंगोलीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा उमेदवार बदलला, उमेदवार शिंदेंचा आणि ठरवते भाजपा हा अफलातून कारभार आहे’, असा टोलाही आमदार बच्चू कडू यांनी लगावला. ” हेमंत पाटील यांची उमेदवारी नाकारली, त्या जागेवर उमेदवार द्यायचे की नाही हे भाजपा ठरवणार.

अजित पवार यांच्या पक्षाचेही उमेदवार भाजपा ठरवत आहे. अमरावतीमध्ये सगळे एकत्र येऊन नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका म्हणत होते पण, तिथे त्यांनी उमेदवारी दिली. जिथे महायुतीचे उमेदवार पडले त्या जागेची भाजप मागणी करत होते पण बदलले नाही, सोबत घेऊन अशा प्रकारचे वागणे चुकीचे आहे. अशामुळे भाजपवर कोणी विश्वास ठेवणार नाही, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.

Related Posts