IMPIMP

Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil | ‘मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला,आमदारकीचं काय घेऊन बसलात’; भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा

by sachinsitapure

मुंबई: Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil | राज्यात मराठा (Maratha Samaj) आणि ओबीसी समाज (OBC Samaj) आमने-सामने आले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार अडचणीत सापडले आहे. एकीकडे मराठा समाज आरक्षणासाठी (Maratha Reservation Andolan) आंदोलन करीत आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते आपल्या कोट्यातील इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये म्हणून मागच्या काही दिवसांपासून उपोषण करीत आहेत.

राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलीच जुंपली आहे. दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला आहे. तर, भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचा हा इशारा उडवून लावला आहे.

भुजबळ म्हणाले,” मराठ्यांवर अन्याय करा असं आम्ही म्हटलं नाही. त्यांना सेपरेट आरक्षण द्या असं सांगितलं. सारथीच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना सर्वाधिक सुविधा आहेत. आमचा त्याला विरोध नाही. आणखी काय पाहिजे? घरेही सरकार देत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहे. कर्ज माफीच्या योजना आणत आहोत. विद्यार्थ्यांची फी देत आहोत. शहरात शिकणाऱ्यांना वसतिगृह देणं, वसतिगृहाची सुविधा देता येत नसेल तर ६० हजार रुपये देणं या गोष्टी सरकार सर्वांसाठी करत आहे. मग अडचण काय आहे?, असा सवाल भुजबळ यांनी केला.

तुमचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ते पुढे म्हणाले, ” मी मंत्रीपदाचाही राजीनामा दिला होता. तिथे आमदारकीचं काय घेऊन बसलाय? माझं करीअर चालवणं किंवा संपवणं हे पक्षाच्या आणि जनतेच्या हातात आहे. जनतेचं कोर्ट सर्वश्रेष्ठ आहे. त्यांना जर नऊ मंत्र्यांना घरी बसवायचं तर बसवा. भुजबळांना घरी बसवलं तर भुजबळ ओबीसांचा मुद्दा रस्त्यावर येऊन मांडेल “, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Related Posts