IMPIMP

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘लखनऊमध्ये त्यांची 200 एकर जमीन पण मी फक्त…’

by sachinsitapure

मुंबई : Eknath Shinde On Uddhav Thackeray | महायुती सरकारला (Mahayuti Govt) रविवारी दोन वर्षे पूर्ण झाली. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली होती. महायुती सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) विचार राज्याच्या विकासाचा ध्यास यावर दोन वर्षे पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. तसेच एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी कमी काळात महायुती सरकारने खूप काम केल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यासोबत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार निशाणा साधला.

शिंदे म्हणाले, “ठाकरे गटाची जागा फक्त आरोप करणाऱ्यांमध्ये आहे. माझ्याकडे त्यांच्याविषयी भरपूर माहिती आहे. लखनऊमध्ये त्यांची २०० एकर जागा आहे. आणखी कुठे काय काय आहे याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. पण मी आरोपाला फक्त आरोपाने उत्तर देत नाही. यावर योग्य वेळी मी सर्व बोलणार आहे,” असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला.

“ज्यांचं आयुष्य फक्त खोके जमा करण्यात गेलं. उठता, बसता त्यांना खोक्याशिवाय काहीही समजलं नाही याचा साक्षीदार मी आहे. राज ठाकरे एकदा म्हणाले होते की, त्यांना खोके नाही कंटेनर पाहिजे. खोके ठेवायला कंटेनर लागतो ना? त्यांनी आयुष्यभर फक्त खोके जमा करण्याचं काम केलं आहे,” असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

प्रत्यक्षात कमी काळात महायुती सरकारने खूप काम केले. महाविकास आघाडीने बंद केलेली कामे मग ती मेट्रोची असो वा रस्त्याची. ती सर्व कामे आम्ही पुन्हा सुरु केली आहेत. जनतेची इच्छा आहे की आम्ही सत्तेत यावे कारण आम्ही सर्वसामान्यांचे सरकार आहोत. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Related Posts