IMPIMP

Kirloskar Brothers | किर्लोस्कर बंधूंच्या कंपन्यांमध्ये 130 वर्षांच्या वारशावरून वाद; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Kirloskar Brothers | kirloskar companies tussle over right claim 130 year legacy writes letter sebi

मुंबई न्यूज (Mumbai News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Kirloskar Brothers | मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांमध्ये असलेल्या वादाची चर्चा नेहमीच आपण ऐकली आहे त्यातून निर्माण झालेली परिस्थितीही आपण पाहिली आहे. आता यामध्ये आणखी एक नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे किर्लोस्कर कुटुंब. किर्लोस्करांच 130 वर्ष जुन्या वारशाचं प्रकरण (Inheritance case) समोर आलं आहे. संजय किर्लोस्कर (Sanjay Kirloskar Brothers) यांच्या नेतृत्वाखालील किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडनं (Kirloskar Brothers Limited) आपल्या दोन्ही भावांनी (Kirloskar Brothers) वारसा हक्क हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचे म्हंटले आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडनं अजय किर्लोस्कर आणि राहुल किर्लोस्कर यांच्या अंतर्गत येणाऱ्या चार कंपन्यांनी त्यांच्या 130 वर्षांच्या वारसा हिसकावून घेण्याबरोबरच जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही म्हंटले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

KBL चं सेबीला पत्र

दरम्यान, या आरोपांचं त्यांच्या भावांकडून पक्षाकडून खंडन करण्यात आलं आहे. कुटुंबातील वाद वाढल्यानंतर केबीएलनं (KBL) थेट बाजार नियामक सेबीला (sebi) एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्येही केबीएलचा वारसा हिसकावण्याचा किर्लोस्कर ऑईल इंजिन्स (Kirloskar Oil Engines), किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड (Kirloskar Industries Limited), किर्लोस्कर न्युमॅटिक (Kirloskar Pneumatic) कंपनी आणि किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज (Kirloskar Ferrous Industries) लिमिडेटनं प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

 

 

किर्लोस्कर इंडस्ट्रीजकडून स्पष्टीकरण

सेबीला पाठवलेल्या पत्रात केबीएलचा वारसा आपला वारसा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केल्याचंही नमूद केलं आहे. दरम्यान, याबाबत किर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून सेबीला लिहिलेल्या पत्रात काही तथ्यात्मक चूका आहेत. संपूर्ण पत्रकात केबीएलचा उल्लेखही करण्यात आला नाही त्यामुळे किर्लोस्कर ब्रदर्सचा वारसा हिसकावून घेण्याची गोष्ट तर दूरच राहते असे सांगण्यात आले आहे.

 

 

दाव्यावर प्रश्नचिन्ह

अतुल आणि राहुल किर्लोस्कर यांच्या नेतृत्वाखालील पाच कंपन्यांनी 16 जुलै रोजी आपल्याशी निगडीत व्यवहार नव्या पद्धतीनं सुरू करण्याच्या प्रक्रियेची घोषणा केली होती.
यावेळी नव्या ब्रँडची ओळख आणि रंगांची घोषणा केली होती.
त्याचबरोबर नवा किर्लोस्कर लोगोही (New Kirloskar logo) निवडला होता.
या घोषणेदरम्यान 130 वर्ष जुन्या नावाचा वारसा हा रंग दर्शवतो, असं सांगण्यात आलं होतं.

 

 

130 वर्ष जुना वारसा मानण्यास नकार

केबीएलनं पहिल्या पक्षाच्या आरोपावर आक्षेप घेत सेबीला पत्र लिहिलं आहे. त्यात केओईएल, केआयएल, केपीसीएल आणि केएफआयएलची स्थापना अनुक्रमे 2009, 1978, 1974 आणि 1991 मध्ये झाली
असून त्यांना 130 वर्षांचा वारसा नसल्याचे म्हंटले आहे.
त्यामुळे आता सेबी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title : Kirloskar Brothers | kirloskar companies tussle over right claim 130 year legacy writes letter sebi

 

हे देखील वाचा :

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ ! ED ही खोलणार ‘पॉर्न’राज, हॉटशॉटसाठी ‘अ‍ॅपल’कडून मिळाली एवढी रक्कम

Pune News | पुण्याच्या चारही धरणात पुणेकरांना वर्षभर पुरेल एवढं पाणी जमा

Accident News | काळाचा घाला ! तीन आठवड्यातच मोडला संसार; नवोदित अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू

 

Related Posts