IMPIMP

Mahadev Jankar | विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने महादेव जानकर नाराज; स्वतःच प्रतिक्रिया देत म्हणाले…

by sachinsitapure

मुंबई : Mahadev Jankar | सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकांची (Vidhan Parishad Election Maharashtra) राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. भाजपकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली. त्यामध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह पाच जणांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये सदाभाऊ खोत (Sadabahu Khot), योगेश टिळेकर (Yogesh Tilekar), अमित गोरखे (Amit Gorkhe), परिणय फुके (Parinay Phuke) यांचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

१२ जुलैच्या दिवशी विधान परिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विधानपरिषदेला महादेव जानकर यांनाही उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. त्यावर स्वतः महादेव जानकर यांनी स्वतः प्रतिक्रिया देऊन नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे.

माध्यमांशी बोलताना जानकर म्हणाले, ” मी दोन टर्म विधानपरिषदेत काम केलं आहे. आता वरचा मार्ग बघितला पाहिजे. मी नाराज नाही. आमचा पक्ष महायुतीबरोबर आहे. जनतेने आम्हाला जो कौल दिला तो आम्हाला मान्य आहे. पुन्हा आमचा पक्ष कसा वाढेल त्यासाठी काम करणार आहे. मी स्वतः आता विधानसभा निवडणूक लढणार नाही असेही महादेव जानकर यांनी सांगितले.

विधानसभेचे संख्याबळ २७४ इतके आहे. विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मतांचा कोटा २३ वर आला आहे. विधानसभेत काँग्रेसचे ३७, उद्धवसेनेचे १५ आणि शरद पवार गटाचे १३ असे एकूण ६५ आमदार आहेत. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख उद्धव सेनेसोबत आहेत. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ ६६ पर्यंत जाते.

आघाडीला आपले तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी ६९ मतांची गरज असल्याने आणखी तीन मतांसाठी आघाडीची मदार समाजवादी, एमआयएम, कम्युनिस्ट पक्ष या छोट्या पक्षांवर तसेच अपक्ष आमदारांवर आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या काँग्रेसची मते फुटून काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता.

त्यामुळे काँग्रेस २३ पेक्षा जास्त मतांचा कोटा निश्चित करू शकते. त्यामुळे शरद पवार गट आणि उद्धव सेनेला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची तजवीज करावी लागू शकते.

Related Posts