IMPIMP

Maharashtra Monsoon Session 2024 | काय करायचं ते म्हणणाऱ्या अंबादास दानवेंचं दिलगिरी पत्र; म्हणाले – ‘सभागृहातही तयारी…’

by sachinsitapure

मुंबई: Maharashtra Monsoon Session 2024 | सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार प्रसाद लाड यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिवीगाळ केल्याचाही आरोप आमदार लाड (Prasad Lad) यांनी केला. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी निलंबनाचा ठराव विधान परिषदेत मांडला. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी पाच दिवसाच्या निलंबनाची घोषणा केली. या निलंबनाच्या कारवाईनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपही झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या सभापतींना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे.

सभापतींना दिलेल्या पत्रात दानवे म्हणालेत की , ” मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्याने सभागृहाचे पावित्र्य, नियम, प्रथा आणि परंपरा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. परंतु दि. १ जुलै २०२४ रोजी माझ्याकडून अनावधानाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले. सभापती महोदया, या संदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहिरपणे दिलगीरी व्यक्त केली आहे, हे आपण जाणताच आणि माझीही भूमिका सभागृहाचे पावित्र्य कायम रहावे हीच आहे, त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतु परंतु नाही, असंही या पत्रात म्हटले आहे.

सभागृहाचे कामकाज सुरू आहे, या स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता-भगिणीचे अनेक प्रश्न मला सभागृहात मांडायचे आहेत. जेणेकरुन सरकार त्या प्रश्नाला न्याय देईल, त्यामुळे माझे निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता भगिणींचे प्रश्न सोडवण्यापासून मला थांबविणे असे होऊ नये, या हेतूने माझ्या निलंबनाचा फेरविचार करावा, ही विनंती, असंही पत्रात म्हटले आहे.

Related Posts