IMPIMP

Maharashtra Monsoon Session | अंबादास दानवेंच्या निलंबनावर विधानपरिषदेत मोठा निर्णय; जाणून घ्या

by sachinsitapure

मुंबई : Maharashtra Monsoon Session | विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत केलेल्या विधानावरुन विधान परिषदेत चर्चा सुरू झाली होती. यावरुन भाजपा आमदार प्रसाद लाड विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे बोट करुन बोलत होते. यावेळी अंबादास दानवे जाग्यावरुन उठले आणि म्हणाले, सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे हे वक्तव्य ज्यांचं असेल त्याचं ते लोकसभेत झालेलं आहे. त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का? असा सवालही दानवे यांनी केला.

दानवे यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी गटातील आमदारांनी गोंधळ सुरू केला. यावेळी अंबादास दानवे यांचा तोल सुटल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार प्रसाद लाड यांच्यात वादंग झाला. दरम्यान अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याचाही आरोप आमदार लाड यांनी केला.

यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी निलंबनाचा ठराव विधान परिषदेत मांडला. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी पाच दिवसाच्या निलंबनाची घोषणा केली.

मात्र झालेल्या प्रकारावर दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या कारवाई संदर्भात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत प्रस्ताव मांडला. अंबादास दानवे यांच्या निलंबन कालावधीत कपात करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवल्यानंतर सर्वांनी एकमताने मंजूर केला. त्यामुळे आता अंबादास दानवे यांना दिलासा मिळाला असून ते उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून सभागृहात उपस्थित राहणार आहेत.

Related Posts