IMPIMP

Maharashtra Monsoon Session | सभागृहातील गोंधळानंतर अंबादास दानवे म्हणाले, “… तर मी राजीनामा देत “

by sachinsitapure

मुंबई: Maharashtra Monsoon Session | सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करीत आहेत. नीट परीक्षा (NEET Exam), ड्रग्स प्रकरण (Pune Drugs Case), शेतकरी, महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

दानवे यांनी शिवीगाळ केल्याचाही आरोप आमदार लाड यांनी केला आहे. याबाबत प्रसाद लाड माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी बोलताना शिवीगाळ केल्याचा आरोप केला. तसेच दानवे यांनी सभागृहाची माफी मागावी असेही म्हंटले आहे. तर भाजपाकडून दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ” प्रसाद लाड यांनी सभापतींशी बोललं पाहिजे. माझ्याशी बोलण्याचा काही संबंध नाही. कारण मी त्यांना नाही तर सभापतींना प्रश्न विचारला होता. त्यांनी माझ्याकडे हातवारे करून व्यक्तिगत विरोधीपक्ष नेत्यांनी हे करा, ते करा, अशा पद्धतीने ते बोलत होते. प्रसाद लाड हे कोण आहेत? ते हिंदुत्ववादी आहेत का? ते मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर हिंदुत्वाचे ७० ते ८० गुन्हे आहेत. हे लोक मला हिंदुत्व शिकवणार का? त्यामुळे माझ्यामधील शिवसैनिक जागा झाला”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.

दानवे पुढे म्हणाले, “मग मी डायसवरून बाजूला होऊन बोललो. समोर असते तर हातापायी झाली असती. कारण ते व्यक्तिगत घेत होते, तर मलाही व्यक्तिगत घेतलं पाहिजे ना? काय बोलावं आणि काय नाही, ते काय माझे मालक आहेत का? मला त्यांनी निवडून दिलं का? माझा राजीनामा माझ्या पक्षाचे नेते पाहतील. ते कोण आहेत माझा राजीनामा विचारणारे? राजीनामा द्यावा असं ते बोलले आहेत. मग मी बोललो तसं तेही बोलले आहेत. त्यांनीही राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत असतील तर मीही राजीनामा द्यायला तयार आहे असे दानवे यांनी म्हंटले आहे.

Related Posts