IMPIMP

Maharashtra Vidhan Parishad Election | विधान परिषद निवडणूक अटळ! कोणाची होणार सरशी, कोणाला बसणार धक्का, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

by sachinsitapure

मुंबई : Maharashtra Vidhan Parishad Election | आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांना मतांसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. या निवडणुकीत कोण वरचढ ठरणार आणि कोणाचे आमदार फुटणार, वाढीव मतांची व्यवस्था संबंधीत पक्ष कशी करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना शिंदे गट (Shivsena Eknath Shinde), राष्ट्रवादी अजित पवार गटाला (Ajit Pawar NCP) मते फुटण्याची भीती असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेत मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) याचे दोन्ही दगडावर पाय असल्याने त्यांचे नाव देखील चर्चेत आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे १७ ते १८ आमदार शरद पवारांकडे (Sharad Pawar) जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

या राजकीय स्थितीमुळे भाजपाचा (BJP) स्वत:च्या आमदारांवर जरी विश्वास असला तरी शिंदे आणि पवार गटाच्या आमदारांनी दगाफटका केल्यास महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला फटका बसू शकतो.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती एक पाऊल मागे घेणार की मविआ याबाबत उत्सुकता होती. मात्र, तीन वाजून गेल्यानंतर निवडणूक अटळ असल्याचे स्पष्ट झाले. तसेच शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक होत आहे.

विधानसभेत भाजपचे १०३, शिंदेसेनेचे ३९, अजित पवार गटाचे ४० आमदार आहेत. या पक्षांना काही अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांचा पाठिंबा आहे. महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

भाजपाला यासाठी ११५ आमदारांचे पाठबळ लागणार असल्याने १२ मतांची बाहेरून जमवा-जमव करावी लागेल. अपक्ष व लहान पक्षांचे ९ आमदार भाजपसोबत आहेत. शिल्लक तीन मतांची व्यवस्था करणे भाजपासाठी सोपे आहे.

तर शिंदेसेनेने माजी खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. त्यासाठी त्यांना ७ अतिरिक्त मते लागतील. अजित पवार गटाने राजेश विटेकर (Rajesh Vitekar) आणि शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनाही सहा मतांची व्यवस्था करावी लागेल. शिंदे यांना १० अपक्षांचा आहे. काँग्रेसचे दोन आमदार अजित पवारांकडे आहेत.

Related Posts