IMPIMP

Mahavikas Aghadi On Maharashtra Assembly Election | महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? 96,96,96… मुख्यमंत्री कोणाचा होणार? जाणून घ्या

by sachinsitapure

मुंबई: Mahavikas Aghadi On Maharashtra Assembly Election | देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला (BJP) चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप्रणित आघाड्यांची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला (Mahayuti) अवघ्या १७ जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची ३० जागांवर सरशी झाली आहे.

या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. महाविकास आघाडी म्हणून विधानसभेलाही एकत्र लढण्याचे त्यांनी ठरवले आहे.

लोकसभा निवडणुकांनतर आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व राजयकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरवात केली असून जागावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मात देण्याऱ्या महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणूक २०२४ साठी फॉर्म्युला ठरला आहे.

समसमान जागा घेण्याबाबत मविआत विचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. तसेच अधिक आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, अशी माहिती देखील समोर आली आहे. मविआत प्रत्येक पक्षाला विधानसभेसाठी ९६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीने यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (Sharad Pawar NCP) आणि काँग्रेस (Congress) एकदिलाने लढतील. काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये तणाव असल्याच्या बातम्या येत होत्या, आघाडीच्या नेत्यांनी हे फेटाळत एकत्र निवडणुका लढणार असल्याचं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते, “राज्यातील जनतेने भाजपला उत्तर दिले आहे. हा लढा लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी होता. हा विजय आमचा शेवटचा नाही तर लढाई नुकतीच सुरु झाली आहे.

येणाऱ्या काही दिवसात विधानसभा निवडणूका होणार आहे. विधानसभा निवडणूक आम्ही सर्व मिळून लढू. पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने काय केले ते सर्वांसमोर आहे. याला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे “, असे देखील ठाकरे म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीसंदर्भात आमची पहिली बैठक झाली. या बैठकीत आम्ही सर्वजण मिळून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी राज्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत मतदान केले. लोकशाही वाचवण्यात राज्यातील जनतेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”

Related Posts