IMPIMP

Mahavikas Aghadi On Maharashtra Budget 2024 | ‘खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा’; अर्थसंकल्पावरून विरोधकांची घोषणाबाजी

by sachinsitapure

मुंबई: Mahavikas Aghadi On Maharashtra Budget 2024 | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज विधानसभेत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र आजच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वीच विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काल सादर झालेल्या अर्थसंकल्पावरुन विरोधकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांनी ‘खिशात नाही आणा, बाजीराव म्हणा लुटारू सरकार हाय हाय, ४० टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. (Maharashtra Monsoon Session)

महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प म्हणजे तिजोरीत खळखळाट अन् थापांचा सुळसुळाट, बजेटमधून विधानसभेच्या तयारीच्या येतोय वास या घोषणांनी आज विधानभवनाचा परिसर दणाणला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर आज जोरदार निदर्शने करत महायुतीच्या अर्थसंकल्पाची पोलखोल केली.

लोकसभा निवडणुकीचा घेतला धसका, विधानसभेला मस्का अशी महायुतीची अवस्था आहे. बजेटमध्ये मोठ्या घोषणांचा पाऊस पडला पण हा तर विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा आटापिटा आहे यावरून महाविकास आघाडीने जोरदार आंदोलन केले. भाऊ म्हणून दाखवलं महिलांना योजनांचे भुल, महिलाच करतील निवडणुकीत गूल, निधीची वानवा आणि खैरातीचा गारवा अशा जोरदार घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिल्या.

तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावरील व्यंगचित्रातून ‘ किस्सा कुर्सी का?’ असे म्हणत टीका करण्यात आली. एक आघाडी बारा भानगडी , गांव बसा नही लुटेरे आ गये, अशा जोरदार घोषणाही सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आल्या.

Related Posts