IMPIMP

Pankaja Munde | विधानपरिषदेनंतर पंकजा मुंडेंना आता मंत्रिपदही मिळणार?; स्वतः प्रतिक्रिया देत म्हणाल्या…

by sachinsitapure

मुंबई : Pankaja Munde | महाराष्ट्रात पार पडणाऱ्या आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी (Vidhan Parishad Election Maharashtra) भाजपने पाच उमेदवार (BJP) जाहीर केले आहेत. यामध्ये माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीडमध्ये (Beed Lok Sabha) पराभव झाला. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतील नेतृत्वाने पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर भाजपाने सदाभाऊ खोत (Sadabhau Koth), परिणय फुके (Parinay Phuke) , योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) आणि अमित गोरखे (Amit Gorkhe) यांनाही विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, ” भविष्यातील निर्णय संघटना घेत असते.मंत्रिपदाबाबत मी भाष्य करण्याची गरज नाही. संघटनेची शिस्त पाळल्यानंतर संघटना प्रत्येक उमेदवाराला नेत्याला योग्य संधी देत असते.”

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, “एक मास लीडर म्हणून काम करत असताना त्या-त्या नेत्याला दोन गोष्टी सांभाळाव्या लागतात. लोकांच्या भावना आणि संघटनेची शिस्त पाळावी लागते. या दोन गोष्टींमध्ये समतोल साधावा लागतो. मी इतक्या वर्षांपासून राजकारणात आहे. लोकांच्या भावना सांभाळत असताना मी आमच्या संघटनेची शिस्त देखील पाळण्याचा, सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळे पाच वर्षांनी मला संघटनेने संधी दिली आहे. हा संपूर्णपणे संघटनेचा निर्णय आहे. तसेच भविष्यातील निर्णय संघटना घेत असते. मी त्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही आणि तशी पद्धत देखील नाही “, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Related Posts