IMPIMP

Raj Thackeray | “तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याची बातमी कधी मिळणार?” राज ठाकरे म्हणाले – “मॅटर्निटी होम …”

by sachinsitapure

मुंबई : Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात अभिनेता आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राजकारण, समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला, या आणि अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी उपस्थितांच्या मनातील एक प्रश्नही राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत मिश्किल उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

राज ठाकरेंची ही मुलाखत चांगली तासभर चालली. तासभराच्या या मुलाखतीत राज ठाकरे यांना विविध विषयांवर बोलतं केलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी उपस्थितांच्या मनातील एक प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या, “सर्वांच्या वतीने मी तुम्हाला हा प्रश्न विचारण्याची हिंमत करतेय. राज ठाकरे मुख्यमंत्री झाल्याची बातमी कधी मिळणार? असा प्रश्न विचारताच राज ठाकरेही हसू लागले. तेवढ्यात ते म्हणाले, ” मुख्यमंत्री झाल्या झाल्या याची माहिती मिळणार” ते पुढे म्हणाले, ” हे काय मॅटर्निटी होम नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्या झाल्या याची बातमी मिळणार असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Related Posts