IMPIMP

Rohit Pawar On Parli Murder Case | परळीच्या खून प्रकरणात रोहित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ” बोगस मतदान समोर आणले म्हणून…”

by sachinsitapure

मुंबई : Rohit Pawar On Parli Murder Case | बीडमधील परळीत शनिवारी रात्री गोळीबार झाला (Firing In Parli Beed). यात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे जागीच ठार झाले तर ग्यानबा गित्ते जखमी झाले. या घटनेनंतर बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (SP Nandkumar Thakur) यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) नेते बबन गित्ते (Baban Gitte) यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक देवाणघेवाणीतून हा गोळीबार झाल्याचं एफआयआर मध्ये नमूद करण्यात आले. (Beed Crime News)

गोळीबाराच्या घटनेनंतर परळीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मृत बापू आंधळे (Bapu Andhle) हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या घटनेचा संबंध आमदार रोहित पवार यांनी लोकसभा निवडणुकीशी लावला आहे.

याबाबत आमदार रोहित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, ” परळीमध्ये धनंजय मुंडे यांचा राईट हॅन्ड आणि लेफ्ट हॅन्ड सगळं काही चालवतात. त्यांच्या वतीनं काही करण्यात आलं आहे का ते पाहावं लागेल. आमच्या बबन गित्ते यांनी परळीमधलं बोगस मतदान समोर आणलं होत. त्याचा हा राग असू शकतो. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होतोय की त्यांचा राईट हॅन्ड, लेफ्ट हॅन्ड काल दिवसभर आंदोलनामध्ये सहभागी होते. त्यामुळे त्यांचीही चौकशी करा अशी माझी मागणी आहे असे रोहित पवार म्हणाले.

दरम्यान बबन गित्ते यांनी १७ ऑगस्ट २०२३ रोजी शरद पवार गटात प्रवेश केला होता. मोठा लवाजमा घेऊन तब्ब्ल ७०० गाड्या बीडमध्ये नेत त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं होतं. त्यांची पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तेच परळीतील शरद पवार गटाचे उमेदवार असतील अशी चर्चा होती. मात्र आता या गोळीबाराच्या घडलेल्या घटनेमुळे परिस्थिती बदलू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

Related Posts