IMPIMP

Rohit Pawar On Ram Shinde | आमदार रोहित पवारांचं राम शिंदेंना खुलं आव्हान; म्हणाले – ” हिंमत असेल तर…”

by sachinsitapure

मुंबई : Rohit Pawar On Ram Shinde | राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे (Maharashtra Monsoon Session). सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. असे असतानाच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील (Karjat Jamkhed Assembly Constituency) एमआयडीसीच्या प्रश्नावरून (Karjat Jamkhed MIDC) आमदार रोहित पवार यांनी भाजपाचे आमदार राम शिंदे यांना खुले आव्हान दिले आहे. राम शिंदे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एमआयडीसीची कागदपत्रे दाखवावीत असे रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी आणली नाही, याचं अपयश हे रोहित पवारांचं आहे, अशी टीका होत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला असता यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “जेव्हा मी एमआयडीसीबाबत बोललो तेव्हा मी पुराव्यानीशी बोललो आहे. भाजपाचे आमदार राम शिंदे यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर सर्व कागदपत्रे समोर आणावेत”, असं थेट आव्हान रोहित पवार यांनी दिले आहे.

रोहित पवार पुढे म्हणाले, “आता कुठेतरी ड्रोन सर्व्हे सुरु झाला आहे. मग दोन एमआयडीसी होणार असतील तर होऊ द्या ना? एक फॉरेस्टची एमआयडीसी असेल तर त्या ठिकाणी झाडे लावता येतील. आम्ही जी एमआयडीसी पुढे आणत आहोत, त्यामध्ये आपण एमआयडीसीमधील इंडस्ट्री आणता येतील. एका बाजुला झाडे लावण्यामुळे पर्यावरणाचा फायदा होईल. दुसरीकडे आम्ही जी एमआयडीसी आणतो आहोत, त्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळेल. मग यामध्ये दुजाभाव का करत आहात? दोन्हींही होऊ द्या, अडचण काय आहे?”, असा सवाल रोहित पवार यांनी केला.

Related Posts