IMPIMP

Sadabhau Khot On BJP | “भाजपा सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष”; विधानपरिषदेच्या उमेदवारीवर सदाभाऊ खोतांची पहिली प्रतिक्रिया

by sachinsitapure

मुंबई: Sadabhau Khot On BJP | सदाभाऊ खोत यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी (Vidhan Parishad Election Maharashtra) आज जाहीर झाली. भाजपाकडून खोत यांच्यासह जाहीर झालेल्या यादीत पंकजा मुंडे (Pankaja Munde), योगेश टिळेकर (Yogesh Tilekar), अमित गोरखे (Amit Gorkhe), परिणय फुके (Parinay Phuke) यांच्या नावांचा समावेश आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“राज्यातील शेतकरी , शेतमजूर, बारा बलुतेदार यांना ही उमेदवारी समर्पित करतो. भाजपा सर्व घटकांना घेऊन जाणारा पक्ष आहे. अठरा पगड जातींना एकत्र ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने भाजपने केले आहे. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कुटुंबातील शेतकरी चळवळीतील सामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने एक मोठी संधी भाजपाने दिली. याबद्दल निश्चित ऋणी राहीन” असे खोत यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले ,” सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष म्हणून भाजपाकडे बघावे लागेल. या पक्षाने रामदास आठवले, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, पंकजा मुंडे या सर्व घटकांना, तळागाळातल्या माणसांना वर घेऊन जाण्याचे काम सुरुवातीपासून केले.

तसेच निश्चित सर्वसामान्यांची बाजू घेऊन लढणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम हे भाजपाने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानतो. त्यांनी मला ही उमेदवारी घोषित केली आहे “, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सध्याचे विधान परिषदेतील पक्षीय बलाबल पाहायचे झाल्यास भाजपाचे १०३ आमदार आहेत. तर भाजपाचे महायुतीमधील (Mahayuti) मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Eknath Shinde) ३७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) ३९ आमदार आहेत. त्याशिवाय इतर छोटे पक्ष ९ आणि अपक्ष १३ असे एकूण २०१ आमदारांचे पाठबळ महायुतीकडे आहे. सध्याच्या गणितानुसार विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ आमदार निवडून येऊ शकतात. मात्र एखादा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरल्यास ही निवडणूक रंगतदार होऊ शकते.

Related Posts